मनोरंजन

ही मराठी अभिनेत्री आपल्याला दिसणार पवित्र रिश्ता या नवीन मालिकेत

अनेक मराठी अभिनेते हे मराठीतून हिंदीमध्ये गेले आणि त्यांनी आपल्या अभिनयातून एक उत्तम कलाकार आहेत हे ही सिध्द करून दाखवले. महत्वाची गोष्ट म्हणजे हे कलाकार या अभिनयामध्ये इतके समरस झालेले असतात की ते खरंच मराठी आहेत याचा आपल्याला ही प्रश्न पडतो.

खर तर त्यांनी मराठी मध्ये अपल स्थान निर्माण करावं अस प्रत्येकालाच वाटते पण असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे अशीच एक अभिनेत्री तिने यागोदर मराठी मध्ये काम केले आहे पण आता ती आपल्याला एका हिंदी मालिकेत दिसणार आहे.

नवीन येणारी हिंदी मालिका अर्थात याअगोदर ही मालिका होऊन गेली आहे आणि या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. यातील बहुतेक कलाकार हे मराठी होते. यावेळी ही आपली मराठी अभिनेत्री सुचित्रा बांधेकर पवित्र रिश्ता सिजन 2 या हिंदी मालिकेत आपल्याला दिसणार आहे. या मालिकेत ती मुख्य नायिकेच्या आईचा रोल करणार आहे. यात अभिनेत्री अंकिता लोखंडे ही पहिल्यासारखी मुख्य पात्र साकारेल.

Source Suchitra Bandekar Social Media

म्हणायला गेलात तर पहिल्या सिजन मध्ये आईची भूमिका सविता प्रभुणे या मराठी अभिनेत्रीने साकारली होती. शिवाय दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनी मानव ही मुख्य कलाकाराची भूमिका उत्तम पणे सादर केली होती. सुचित्रा हिने सिंघम आणि सिंबा ह्या. दोन हिंदी चित्रपट मधे काम केले आहे. तसेच अनेक हिंदी मालिका आणि चित्रपट मधे त्यांनी काम केले आहेत म्हणून आता त्यांचे चाहते नक्कीच उस्तुक असतील त्यांची ही भूमिका पाहण्यासाठी.

उषा नाडकर्णी अंकिता लोखंडे मालिकेत कायम असतील तर सुशांतची मानव ही भूमिका अभिनेता शाहीर शेख हा अभिनेता करणार आहे. ह्या मालिकेमध्ये अजून अनेक मराठी कलाकार असणार आहेत पण सध्यातरी त्यांची नावे समोर आली नाही आहेत. तुम्हाला अजून कोणत्या मराठी अभिनेता किंवा अभिनेत्रीला ह्या मालिकेत पाहायला आवडेल? नक्की कमेंट करून सांगा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *