बातमी

गणपती बाप्पाचे गाव म्हणजे पेण शहर असे का आहे? हे तुम्हाला माहित आहे का?

आपल्या महाराष्ट्रात गणपती उस्तव म्हणजे गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्व लहान मोठे या उत्सवाची वाट पाहत असतात. आणि म्हणूनच अपना सर्वांना या गणपती विषयी थोडी माहिती असायला हवी. तुम्हाला माहित आहे का हेच गणपती महाराष्ट्रातील पेण या तालुक्यात बनवले जातात. ते ही वर्षभर ही लोक गणपती बनवत असतात. त्यांचे हे कामच आहे हे म्हटलं तरी चालेल.

या पेण तालुक्याच्या गावांमधे बनवली जाणारी गणपती मूर्ती ही अनेक शहरांमध्ये इतकाच काय परदेशात ही पाठवली जाते. मॉरिशस, आस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका या ठिकाणी पाठवल्या जातात आणि म्हणून मुर्त्यांची संख्या जास्त असल्याने येथे हा काम वर्षभर चालतो.

या पेण तालुक्यातील हरामपुर, कलवा, वाशी, जोहे, दिव, भाल, शिर्की, गडब, वडखळ, बोरी, कोप्रोली, उंबर्डे असे गाव आहेत त्या ठिकाणी हे गणपतीच्या लहान मोठ्या मूर्ती बनवल्या जातात. आणि त्यासाठी अनेक कारागीर काम करत असतात. म्हणजेच लहान वयातील मुलांपासून, स्त्रियांपासून ते वयोरुद्ध पर्यंत लोक या कामाला जुंपलेले असतात.

या मूर्ती पाहिले मातीपासून बनवल्या जायच्या अजूनही काही ठिकाणी बनवतात. पण काही ठिकाणी लोकांच्या आग्रहास्तव आणि मूर्तिकार यांनी ही बदल केला आहे. म्हणजेच मातीच्या जागी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करत आहेत. पण महाराष्ट्र सरकारने ने प्लास्टर ऑफ पॅरिस वर बंदी घातली आहे. आता ह्या मूर्ती साच्यात आकारल्या जातात नंतर त्यांना अवजारांचा साह्याने आकार दिला जातो.

नंतर सुकल्यावर रंगरंगोटी करण्याचे काम केले जाते. याशिवाय पेणच्या कच्च्या मूर्ती आणून बाहेर हवी त्यावर रंगरंगोटी करून विकण्याचे काम केले जाते. ह्या मुर्त्या बनवण्यात तब्बल तीस हजार लोक बांधलेले आहेत त्यांना रोजगार मिळतो. गणपती उस्तव झाल्यानंतर ही हे काम संपत नाही याचं ठिकाणी देवी बनवण्याचे काम ही चालू होते नवरात्र मध्ये ह्या देवीचे पूजन संपूर्ण भारतात केले जाते.

बाप्पाची मूर्ती हवी तर पेण शहरात चला अशी जणू संस्कृती बनली आहे. तुम्हीही कधीतरी ह्या शहरात आपल्या लाडक्या बाप्पाला आणायला आलाच असाल. तुमचा अनुभव कसा होता आम्हाला नक्की सांगा.
तर या वेळी सगळ्यांकडे एकच मागणे आहे सर्वांनी मनापासून निसर्गाची हानी होऊ नये याकरिता मातीच्या मूर्तीची स्थापना करावी. जेणेकरून आपला निसर्ग, पर्यावरण सुरक्षित ठेवणे आपले कर्तव्य आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *