बातमी, मनोरंजन

सरोगेसी द्वारे या अभिनेत्रीने दिला जुळ्या बाळांना जन्म

बॉलिवूड मधून आज नव्या आई झालेल्या अभिनेत्री चे नाव समोर आलं आहे. या अभिनेत्रीला तुम्ही सध्या सिनेमात पाहत नसले तरी आयपीएल मध्ये नक्कीच पाहत असाल. हो तुम्ही बरोबर ओळखले आम्ही सांगत आहोत प्रीती झिंटा बद्दल. आताच ती आई झाली आहे. तिने जुळ्या बाळाना जन्म दिला आहे. ही बातमी समोर येताच सर्व बाजूने शुभेच्छांचा वर्षाव तिच्यावर होत आहे.

प्रीती झिंटा सध्या तरी आपल्याला चित्रपट मध्ये पाहायला मिळत नाही ती आपल्या संसारात मग्न आहे. तिचा नवरा जीन गुडइनफ यांच्या दोघांच्या आयुष्यात गोड बातमी आली आहे. दोघेही आई बाबा झाले आहेत ते ही जुळ्या मुलांचे या मुलांच्या येण्याने प्रीती खूप खुश झाली आहे. तिने आपला आनंद सोशल मीडियावर आपल्या बाळांचे फोटो शेअर करून केला आहे. तसेच ही पोस्ट शेअर करत तिने आपल्या दोन्ही मुलांची नावे ही सांगितली आहेत.

तिला मुलगा आणि मुलगी असे दोन गोड जुळी मुल झाली आहेत. त्यांचे नाव तिने जय आणि जिया असे ठेवले आहे. ४६ वर्ष वय असताना तिला आई होण्याचे भाग्य लाभले आहे. सरोगेसी मदरच्या द्वारे ही दोन मुले त्यांना झाली आहेत. सारोगेसी मदर द्वारे आई बाबा होणे ही पहिली अभिनेत्री नाही अशा अनेक सेलेब्रिटी यांनी हाच मार्ग अवलंबला आहे. त्यानंतर प्रीती ने त्यासाठी हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि परिचारिका आणि सरोगेसी मदर या सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.

Source Priti Zinta social handle

प्रीती आणि जीन गुडइनफ यांनी दोघांना काही वर्षे डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि २०१६ मध्ये त्यांनी हिंदू पद्धतीने लग्न ही केले. त्यानंतर प्रीती ही अमेरिकेला तिच्या नवऱ्याच्या घरी राहायला गेली होती पण मधे मध्ये काही काम असेल किंवा आपल्या परिवाराला भेटण्यासाठी येत असते.

तिने दिलसे या चित्रपट मधून तिने फिल्म इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले आहे. तसेच कल हो ना हो, वीर झारा, कभी अलविदा ना कहना, क्या कहना, संघर्ष, दिल चाहता है, लक्ष्य इत्यादी चित्रपट मधून ती झळकली आहे. प्रिंती झिंटा ही या दोन बाळांच्या येण्याने खूप आनंदी आहे तिचा पुढील प्रवास अविस्मरणीय होवो ही सदिच्छा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *