बातमी

प्रियांका चोप्रा आणि निकचं बाळ काही दिवस रुग्णालयातच राहणार कारण

प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स एका बाळाचे आई वडील आहेत पण त्यांनी ही सरोगेसी मदर द्वारे आई वडील होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ही बातमी सोशल मीडिया द्वारे त्यांच्या चाहत्यां सोबत शेअर केली आहे. पण अजून मुलगा झाला की मुलगी ते स्पष्ट केले नाही.

लग्नानंतर तब्बल तीन वर्षांनी ही गोड बातमी त्यांना मिळाली आणि त्यांनी त्याच स्वागत केले. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने आई होण्याची इच्छा एका मुलाखती मध्ये व्यक्त केली होती आणि या न्यूज नंतर लगेचच तिने आपण सरोगेसी द्वारे आई झाल्याचे सांगितले आहे.

काही वृत्त वाहिन्यांनी प्रियांकाला मुलगी झाली आहे असे जाहीर केले आहे पण प्रियांका आणि निक या दोघांनीही तसे काहीच सांगितले नाही. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या दोघांचं बाळ अजून रुग्णालयात आहे. अजून काही दिवस त्याला इथेच ठेवणार आहेत याचे कारण म्हणजे हे बाळ २७ व्या महिन्यात जन्माला आलं आहे. नियोजनानुसार या बकाच जन्म मार्च पर्यत होणार होता पण बाळ लवकर जन्माला आले. म्हणून डॉक्टरांनी बाळाला आपल्या देखरेखी मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या च्या काळात बॉलिवूड मधील अनेक जोडप्यांनी सरोगेसी द्वारे आई वडील होण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या कुटुंबात भरभरून आनंद दिला आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *