मनोरंजन

अजूनही बरसात आहे मधील मनू नक्की आहे तरी कोण बघा

सोनी मराठीवर नव्याने चालू झालेली मालिका अजूनही बरसात आहे सध्या तरी लोकांना आवडत आहे. त्यातील पात्र ही पहिल्यापासूनच लोकांच्या ओळखीची आहेत. त्यातील महत्वाची पात्र म्हणजे मिरा आणि अधिराज हे आहेत. ह्यांची भूमिका मुक्ता बर्वे आणि उमेश कामत हे दोघे करत आहेत. यांची जोडी तब्बल आठ वर्षांनी आपल्या भेटीला आली आहे. शिवाय ही जोडी याअगोदर ही प्रेक्षकांना आवडली होती.

या मालिकेमध्ये अनेक पात्र आहेत पण त्यातील एका पात्राबद्दल आपण आज पाहणार आहोत. ती म्हणजे मिराची बहिण मनू म्हणजेच मनस्वी हीच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. हिचे खरे नाव आहे पूर्वा कौशिक. ही मूळची अंबरनाथची आहे. मात्र आता ती ठाण्याला राहत आहे. तिचा अभिनय सुद्धा लोकांना खूप जास्त आवडत आहेत.

कॉलेज मध्ये असताना तिने अनेक एकांकिके मधे भाग घेतले होते. याशिवाय कॉमेडीची बुलेट ट्रेन, फुलाला सुगंध मातीचा यामधे ती आपल्याला दिसली होती. मनस्वी ही विवाहित आहे तिने अमोघ फडके याच्याशी लग्न केले आहे. तो ही रंग भूमीचा कलाकार आहे.

सध्या ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. या मनस्वीचे घरात लग्न ठरवायचे चालू असताना तिचे बाहेर प्रेमप्रकरण चालू आहे. आणि हे मिराला समजले शिवाय ती गरोदर ही आहे. आणि तिचा बॉय फ्रेंड हा अधिराजचा भाचा आहे हे सुध्दा कळले आहे. पुढे ते दोघे या दोघांचा लग्न करण्याचा प्लॅन करत आहेत पण त्यासाठी कोणकोणत्या नवीन युक्त्या करत आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *