सध्या प्रचंड गाजलेली बातमी म्हणजे राज कुंद्रा याने अश्लील फिल्म बनवलेले प्रकरण उघडकीस आलेले आहे. त्यातून त्याला भरपूर पैसा ही मिळाला आहे पण यात प्रकरणात आपला मराठी अभिनेता उमेश कामत अडकलेला आहे असे मीडिया दर्शवत आहे. ही बातमी उमेश कामत यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
उमेश कामत यापुढे जाऊन म्हणतात की, राज कुंद्रा याच्या बातमी मध्ये उमेश कामत म्हणूनच फोटो लावण्यात आलेला आहे. कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता हिंदी वृत्तवाहिन्यांनी माझी बदनामी केलेली आहे. या बातमीमुळे माझी सामाजिक, वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानी होत आहे. त्यासाठी पूर्णपणे वृत्तपत्र जबाबदार राहणार आहेत. त्यासाठी मी त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करणार आहे.
तर उमेश कामत हा कोण आहे तर राज कुंद्रा यांचा माजी पीए आहे. तो त्याच्या केनरिन प्रॉडक्शन हाऊस मधे भारतातलं काम पाहात होता. त्यामुळे या नावावरून गफलत झाली पण तरीही आपल्या नावाची बदनामी होते हे कोणालाही सहन होणार नाही. गूगलवर उमेश कामत हे नाव सर्च केल्यावर आपला मराठी अभिनेता उमेश कामत यांचे फोटो येतात हे जरी असले तरी नाव मॅच होत असेल तरीही माध्यमांनी फोटो देताना खातरजमा करायला हवी होती. अस अभिनेता उमेश यांचं मत आहे.

अभिनेता उमेश कामत सध्या आपल्याला अजूनही बरसात आहे या सोनी मराठी वाहिनीवर वरील मालिकेत दिसत आहे. तसेच त्याने अनेक सिनेमे तसेच नाटक केले आहेत. आपल्या मराठी अभिनेत्याचे असे नाव जोडणे दुखास्पद आहे. आपण ह्याचा तीव्र निषेध केला पाहिजे. कमेंट करून नक्की निषेध नोंदवा.