बातमी

राज ठाकरे यांचा आवाज या चित्रपटात दुमदुमणार

अनेक चित्रपट येतात जातात पण कधी असे होत नाही की राजकीय नेत्याच्या आवाजात चित्रपटाची सुरुवात होतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवाज आता तुम्हाला चित्रपटगृहात ऐकायला येणार आहे. आताच एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली त्याचे नाव आहे “हर हर महादेव” असं आहे. काहीच दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर लाँच करण्यात आला होता.

छत्रपती शिवरायांच्या काळात प्रत्येक लढाईत या वाक्याची घोषणा केली जायची. त्याने प्रत्येक लढवय्याला एक प्रकारचे बळ यायचे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांनी केलेलं आहे. शिवाय अभिजित गिरीश देशपांडे यांनी ही कथा लीहलेली आहे.

माहितीवरून कळण्यात आले आहे की हा सिनेमा दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे चाहते त्यांचा आवाज ऐकण्यासाठी नक्कीच जातील. त्यांच्या आवाजाचा एक टीझर प्रेक्षकाच्या भेटीला आला आहे. या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक व्हिडिओ मध्ये तुम्ही राज साहेबांचा आवाज ऐकला असेल पण कोणत्या सिनेमात त्यांचा आवाज असेल ही पहिलीच वेळ.

सिनेमाच्या टीझर मध्ये राज साहेबांच्या तोंडून सध्यातरी हे शब्द ऐकू येतात. “जेव्हा मायमाऊलीची बेअब्रू आणि मंदिराला तडा गुन्हा नव्हता, जेव्हा सह्याद्रीला कणा आणि मराठीला बाणा नव्हता.. ही ३५० वर्षानंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे.. ही अठरापगड आरोळ्यांची , आणि माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे.. हर हर महादेव !’

या वाक्यानी भरभरून आणि मनाला प्रेरणा देणारा असा टीझर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील हा सिनेमा आधारित असेल त्यामुळे प्रत्येक शिवप्रेमी आणि माननीय राज ठाकरे यांचे चाहते नक्कीच जातील सिनेमा पाहायला.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *