मनोरंजन

फॅन्ड्री फेम राजेश्वरी करतेय या बॉलिवूड सिनेमातून एंट्री

फॅन्ड्री या मराठी चित्रपट मधून प्रचंड प्रसिद्ध झालेली अभिनेत्री (शालू) राजेश्वरी आता वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे. ते कारण आहे ती आता बॉलिवूड मधील चित्रपटामध्ये तिची एन्ट्री होत आहे. या बॉलिवूड च्या चित्रपटाची घोषणा नुकतीच केलेली आहे. हा फॅन्ड्री मधील सोज्वळ चेहरा बॉलिवूड मध्ये कसा पाहायला मिळेल याची उस्तुक्ता तुम्हाला ही लागली असेल.

हा एक विनोदी चित्रपट असणार आहे. तरीही त्यामधे आपल्याला थ्रिलर आणि सस्पेन्स तसेच अँक्शन ही पाहायला मिळणार आहे. अमोल भागात यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट म्हणजे “पुणे टू गोवा” या हिंदी चित्रपट मध्ये आपल्याला राजेश्वरी वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमात अजून तिच्यासोबत कोणते कलाकार असतील ते गुलदस्त्यात आहेत.

या चित्रपटाची कथा म्हणजेच नक्कीच त्याच्या नावावर आधारित असणार आहे. पुणे ते गोवा हा रोमांचित प्रवास या चित्रपट मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्यराजे मराठे यांनी केली आहे. अजून फारशी माहिती चित्रपटाबद्दल मिळाली नाही. पण सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित होईल.

Source Rajeshwari Kharat Social Handle

फॅन्ड्री मधील सहज सुंदर अशी अभिनेत्री आता वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. फॅन्ड्री या चित्रपट मध्ये तिने एका शाळकरी मुलीची भूमिका केली होती. ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. तिने फॅन्ड्री आणि आयटमगिरी अशा दोन चित्रपट मध्ये काम केले आहे.

या मराठी अभिनेत्रीला तुम्हाला हिंदी चित्रपट मध्ये पाहायला आवडेल का ते कॉमेंट करून नक्की सांगा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *