बातमी, मनोरंजन

बप्पी लहरी यांचे निधन कशामुळे झाले बघा

बप्पी लहरी यांनी हिंदी मधील एक काळ खूप गाजवला होता असे ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचे मुंबई मध्ये निधन झाले आहे. काही दिवसांपासून त्यांची शारीरिक प्रकृती बिघडली होती त्यामुळे त्यांना जुहूच्या क्रीटी केअर या हॉस्पिटल मध्ये अडमिट करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांचे उपचार करूनही अखेर मंगळवारी रात्री ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. बऱ्याच महिन्यापासून ते दीर्घ आजाराने ग्रस्त होते.

बप्पी लहरी यांची कारकीर्द बघाल तर त्यांनी “नन्हा शिकारी” या सिनेमातून फिल्मी जगतात पदार्पण केले होते. पण त्यांना यश मात्र “डिस्को डान्सर” या चित्रपटामुळे मिळाले. त्यांचे खरे नाव आलोकेश लहरी असे होते. त्यांच्या गाण्याची शैली वेगळी होती ते रॉक आणि डिस्को गाण्या साठी ओळखले जायचे. तसेच अनेक सोन्याचे जाड दागिने घालण्याची त्यांची आवड होती गळ्यात जाडजूड चैन आणि बोटात अंगठ्या तसेच डोळ्याला चष्मा अशी त्यांची ओळख होती.

नमक हलाल, शराबी, हिम्मतवाला, साहेब, गुरू, घायल आणि रंगबाज यांसारखे चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केले आहेत. तसेच टॅक्सी नंबर 9211,द डर्टी पिक्चर,हिम्मतवाला, बद्रीनाथ की दुल्हनिया आणि व्हाय चीट इंडिया या नव्याने आलेल्या चित्रपटांना ही त्यांनी संगीत दिले आहे.

चलते चलते,डिस्को डान्सर, शराबी याशिवाय भंकस या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलेले गाणी आहेत. तसेच बागी ३ या शेवटच्या चित्रपटात त्यांनी गायले होते. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी मध्ये झाला होता याशिवाय त्यांना दोन मुले आहेत.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *