बातमी

गानकोकिळा हरपली, भावपूर्ण श्रद्धांजली लता मंगेशकर

लता मंगेशकर यांच्या तब्बेतीबाबत सर्वानाच शंका होती शिवाय काही काळापासून त्यांची तब्बेत ही बरी नव्हती. त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे त्यांना ९ तारखेला ब्रिच कँडी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. कोरोना सोबत त्यांना निमोनिया ही झाला होता त्यामुळे आता त्या जवळ जवळ १५ दिवस आयसी यू मध्ये होत्या. हॉस्पिटल मधील डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सतर्क होत्या.

Source Instagram

त्या आता ९२ वर्षाच्या होत्या त्यांनी १३ व्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली आहे म्हणजे १९४२ मध्ये गायनाला सुरुवात केली होती. त्यांनी वेगवेगळ्या भाषेत तब्बल ३०,००० गाणी गायली आहेत. त्या आजपर्यंत एकट्या होत्या त्यांनी आपले सर्व आयुष्य गायनाला समर्पित केले होते. त्यांनी लग्न केले नाही.

त्यांचा जन्म मध्यप्रदेश, इंदोर मध्ये झाला होता. याशिवाय त्यांचे वडील हे सुध्दा रंग मंचावरील गायक होते. केवळ पाच वर्षाच्या असताना त्यांनी नाटकामध्ये काम केले होते. त्यांना आतापर्यंत भारत रत्न 2001, पद्मविभूषण 1999, दादा साहेब फाळके अवॉर्ड 1989, पद्म भूषण 1969 असे भरायचे महत्त्वाचे समजले जाणारे अवॉर्ड मिळाले.

Source Instagram

सर्वांना संगीताचे वेड लाऊन दीदी आया सर्वांना पोरके करून गेल्या. त्यांच्या जाण्याने संपूर्ण भारतावर दुःख कोसळलं आहे. कारण त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त आया संगितासाठी दिलं. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *