बातमी

सिनेसृष्टी पुन्हा एकदा हळहळली ,या प्रसिद्ध अभीनेत्याच्या मृत्यूने सिनेसृष्टीत शोककळा

राघवेंद्र कडकोळ

90s चा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरलेला ” झपाटलेला हा चित्रपटात दिगग्ज कलाकार होते. त्या वेळच्या चित्रपटांमधील हा ब्लॉकबस्टर सिनेमा होता. यात सर्वांच्याच लक्षात राहणारी भूमीका म्हणजे बाबा चमत्कार. त्या अजरामर भूमिकेनंतर नावरूपाला आलेले राघवेंद्र कडकोळ यांनी वयाच्या 83 व्या वर्षी सायंकाळी अखेरचा स्वास घेतला.

अभिनय क्षेत्रात मोलाचं योगदान देणारे राघवेंद्र कडकोळ अभिनेते आणि उत्तम लेखक देखील होते. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा स्वास घेतला. आपल्या अभिनयाचा ठसा चित्रपट सृष्टीत उमटवून आपली ओळख निर्माण केली. त्यांनी मराठी चित्रपट, नाटक, तसेच दूरचित्रवाहिनी मालिकांतून अभिनय केला आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या बाबा बाबा चमत्कार ने तर धूम माजवली होती. ‘झपाटलेला’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात ‘ओम भगनी भागोदारी’ मंत्र म्हणणाऱ्या ‘बाबा चमत्कार’ या मांत्रिकाची भूमिका भूमिका गाजली होती. या ओम भागणी भागोदरी डायलॉग तेव्हा पासून आज पर्यंत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणाला माहीत नसेल अशी व्यक्ती सापडणं मुश्किल.

‘झपाटलेला’मधील ‘बाबा चमत्कार’ काळाच्या पडद्याआड गेले आणि मराठी चित्रपट सृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला. त्यांच्या अभिनयाने फुलणारे चित्रपट आता पाहायला मिळणार नाहीत. आपल्या कामाने आपला ठसा उमटवणारे राघवेंद्र यांना बालगंधर्व परिवारातर्फे ज्येष्ठ नाटय़-चित्रपट अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. यांसारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवलेले हरहुन्नरी कलाकार चित्रपट सृष्टीने गमावले. राघवेंद्र यांचा पहिला चित्रपट म्हणजे कृष्णधवल. या चित्रपटातुन त्यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले. राघवेंद्र यांनी नाटकांत देखील सुरेख भूमिका वठवल्या.त्यांनी काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर यासारख्या दिग्गज कलावंतांसोबत काम केले.

यात कडकोळ यांची ‘झपाटलेला’ या चित्रपटातील ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका विशेष गाजली. या भूमिकेतून त्यांना नवी ओळख मिळाली., ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ ‘अश्रूंची झाली फुले’ यांसारख्या अनेक नाटकांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. लहानपण काहीसे हलाखित गेले. लहानपणीच पितृछत्र हरपल्याने त्यांनी काम धंदा पाहायला सुरवात केली.

जंगल खात्यात टायपिस्टची किरकोळ नोकरी धरली. मात्र या दरम्यान आपल्यातल्या सुप्त गुणांचा विकास व्हावा अशी त्यांना मनोमन वाटत होतं. त्यासाठी त्यांनी नाटक कंपनी मध्ये देखील छोट्या मोठ्या कामांसाठी जायला सुरवात केली. जसे खुर्च्या लावणे, चहा पाणी बघणे. हळूहळू ओळखी वाढल्या आणि त्यांना त्यांच्या गुणांच्या सादरीकरण करायला एक संधी मिळली. ” करायला गेलो एक ” या नाटकातून त्यांनी पदार्पण केले.

त्यानंतर त्यांची ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील ‘धर्माप्पा’ ही भूमिकाही गाजली. यातून एक नवी संधी निर्माण झाली. हळूहळू अभिनय क्षेत्रात पाय घट्ट रोवून उभे राहायला शिकले. आणि यथावकाश अभिनयाची उंची गाठत अनेक अजरामर भूमिका देखील साकारल्या. राघवेंद्र कडकोळ यांनी ‘गौैरी’, ‘सखी’ ‘ब्लॅक अँड व्हाईट’, ‘कुठे शोधू मी तिला’, या मराठी चित्रपटांमध्ये, तर ‘छोडो कल की बाते’ या हिंदी चित्रपटात काम केले आहे. इतकेंच नाही तर कडकोळ हे उत्तम लेखक देखील होते.

कडकोळ यांनी ‘गोल्ड मेडल’ नावाचे पुस्तकही लिहीले आहे. लेखनाची आवड असल्याने त्यांनी लेखनकला देखील उत्तमरीत्या जोपासली. आपल्या अजरामर भूमिकांतून आपला ठसा उमटवणारे हरहुन्नरी कलाकार आज आपल्यात नाही यामुळे चित्रपट क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. चित्रपट, नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या दुःखद निधनाची बातमी कळताच चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *