सरू आज्जी म्हणजे तुम्हाला माहीतच असेल अत्यंत थोड्या कालावधीत गाजलेले हे पात्र लोकांच्या मनात भिनले आहे. देवमाणूस मधील ही आज्जी दिसायला आंधळी पण तिच्या नजरेतून कोणतीही गोष्ट चुकत नाही. ह्या आज्जीने प्रत्येकाला उपमा देताना अत्यंत शॉर्ट कट पद्धतीने जुन्या म्हणींचा वापर केला आहे आणि या म्हणी लोकांना ही खूप आवडल्या आहेत. त्यामुळे ही आज्जी अत्यंत थोड्या काळात इतकी लोकप्रिय झाली.
सरू आज्जीची भूमिका करणाऱ्या या आज्जी नेमक्या आहेत तरी कोण हे तुम्हाला नक्कीच माहीत नसेल तर या आज्जिंचे खरे नाव आहे रुख्मिणी सुतार. याशिवाय या आजींनी अनेक मालिका व चित्रपट मध्ये काम केले आहे. वयाला कोणत्याही गोष्टीचे बंधन नसते हे या आज्जीने सिद्ध केले आहे बघायला गेलात तर तिचे वय 70 वर्ष आहे.
मिसेस मुख्यमंत्री, लागिर झालं जी, दुर्गा, यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे तर जाऊद्या ना बाळासाहेब, अतिथी, बघतोस काय मुजरा कर, होम स्वीट होम, पोशिंदा, पहिली शेर दुसरी सव्वाशेर यांसारख्या मराठी चित्रपटामध्ये या आज्जीने काम केले आहे. याशिवाय दबंग या चित्रपटात छोटी भूमिका ही केली आहे. याशिवाय गाव लय झाक या वेळी या वेब सिरीज मध्ये सुध्धा ही आजी पाहायला मिळाली आहे.
देवमाणूस या मालिकेतील डॉक्टर अजित बद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का
पण अभिनय करण्यापूर्वी या आज्जी सरकारी खात्यात सिंचन खात्यात कामाला होत्या. हळू हळू नाटकात काम करायची आवड या आज्जीला लागली सुट्टी असताना नाटकात काम करणे हा अज्जीचा छंद आहे जशी सगळ्यांची इच्छा असते तशीच या आज्जीची अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करण्याची इच्छा आहे.