मनोरंजन

गौरव मोरेच्या या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा

महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधील हास्य कलाकार लोकांना पोट धरून हसवणारा गौरव मोरे सध्या एका वेगळ्याच गोष्टी मुळे नजरेत आला आहे. स्वतःच्या अपमनावर दुसऱ्यांना हसवणारा एकमेव मराठी विनोदी अभिनेता याने सध्या आपले फोटो असणारा कॅलेंडर लाँच केला आहे.

या कॅलेंडरच्या लॉन्चच्या वेळी हास्य जत्रेचे लेखक आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी तसेच या शो मधील अनेक कलाकार ही उपस्थित होते. त्या सर्वांनी तसेच सचिन गोस्वामी यांनी गौरव याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

चाहत्यांनी ही त्यांच्या या व्हिडिओला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या या कॅलेंडर लॉन्चवर सचिन यांनी आपले मत व्यक्त केले आहे. म्हणतात की, गौरव याचा आम्ही इतका अपमान करतो पण त्याच्या चाहत्यांना खरोखर त्याचा राग येत असेल तशा प्रतिक्रिया ही येत असतात. पण खरं पाहिलं तर या सेट वरती गौरवचे खूप लाड होतात. मला त्याचा अभिमान आहे की, गौरव असा एकमेव कलाकार आहे जो अपमानातून मान मिळवतो आहे. याशिवाय लोकांना यातून हसवत आहे.

तर गौरव मोरेची कॉमेडी तुम्हाला आवडते का याशिवाय सचिन यांनी केलेलं गौरवच कौतुक तुम्हाला आवडले का हे कमेंट करून सांगा. गौरव मोरेबद्दल या गोष्टी देखील वाचा, ज्या आजवर तुम्हाला माहीत नसतील.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *