बातमी, मनोरंजन

सचित पाटील आता कमबॅक करत आहे मालिकेतून

मराठी चित्रपट मधून सचित पाटील या अभिनेत्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आकर्षित तर केले आहेच पण हाच अभिनेता आता आपल्याला एका मालिकेतून पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवर “अबोली” ही मालिका नव्याने सुरू होणार आहे. त्यात तुम्हाला सचित पाटील पाहायला मिळेल. त्याने या मालिकेत इन्स्पेक्टर अंकुश म्हणून भेटीला येणार आहे त्यामुळे या मालिकेत काहीतरी नवीन पाहायला मिळेल अशी आशा आहे.

Source Sachit Patil Social Handle

स्टार प्रवाह सारख्या वाहिनी बरोबर काम करताना त्याला खूप आनंद होत आहे आणि ह्या मालिके साठी तो खूप उस्तुक ही आहे असे म्हणाला. मी ह्या वाहिनीचा पहिल्यापासूनच चाहता आहे आणि इथे काम करण्याची माझी कधीपासून इच्छा होती ही इच्छा अबोली या मालिकेने पूर्ण केली आहे. याच्या अगोदर ही त्याने एका चित्रपट मध्ये इन्स्पेक्टरची भूमिका केली होती त्यानंतर आता अबोली या मालिकेत इन्स्पेक्टरची भूमिका साकारण्याचे काम मिळाले आहे.

“अबोली” ही एक मुलगी आहे आणि तिचाच संघर्ष या मालिकेत दाखवला गेला आहे. गौरी कुलकर्णी ही अबोली या मुलीची भूमिका साकारणार आहे. नावाप्रमाणे अबोली ही कमी बोलणारी, शांत तीच म्हणणं ती मांडू शकत नाही मालिकेतून काम करण्याचा हा एक अतिशय सुंदर प्रयत्न की ज्यामुळे आपण रोज प्रेक्षकांच्या घरात पोचतो त्याच्या फॅमिलीचा भाग आपण होतो असे सचित म्हणाला.

या मालिकेत अजूनही अनेक कलाकार आपल्याला पाहायला मिळतील प्रतिक्षा लोणकर, मौसमी तोंडवळकर, शर्मिष्ठा राऊत, संदेश जाधव, अपर्णा अपराजित, अंगद म्हस्कर, दीप्ती लेले हे सुध्दा आपल्याला दिसतील. ही मालिका २३ नोव्हेंबर पासून रात्री १०.३० वाजता स्टार प्रवाह या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

तुम्हाला सचित पाटील यांचा अभिनय कसा वाटतो? याआधी कोणत्या सिनेमातले त्यांचे काम तुम्हाला आवडले आहे. तुमचा अभिप्राय नक्की कळवा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *