बातमी

आधी आई मग बाबा आणि आता मुलाचाही मृत्यू

रायगड : मृत्यू अटळ आहे, कधी ना कधी तो आपल्याला हरवून स्वतः जिंकेल. जगात आलेला कधी ना कधी हे जग सोडून जाणार हे ठरलेलं आहे. पण कधी कधी अशा काही गोष्टी घडून जातात की मृत्यचाही आपल्याला राग येतो. हे तुम्ही आम्ही कधी ना कधी अनुभवले असेलच. अशीच काही अंगावर काटा येणारी घटना घडली आहे.

पनवेल विभागातील नावडे गावात अशीच एक घटना घडली आहे. ही घटना ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. स्वर्गीय लक्ष्मण शेठ पाटील – नावडेकर ह्यांच्या कुटुंबातील ही घटना आहे. एकाच महिन्यात ह्या कुटुंबाने आपली तीन माणसे गमावली आहेत. एक महिन्यापूर्वी १८ जुलै रोजी स्वर्गीय लक्ष्मण शेठ पाटील – नावडेकर ह्यांच्या पत्नी जनाबाई लक्ष्मण पाटील ह्यांचे आजाराने निधन झालं.

दुःख सावरत असताना ह्या कुटुंबाला आणखी एक धक्का बसला. ५ ऑगस्ट रोजी पनवेल विभागातील राजकिय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे लक्ष्मण शेठ पाटील – नावडेकर ह्यांचा मृत्यू झाला. ह्या निधनानंतर आता ११ ऑगस्ट रोजी त्यांचा मुलगा अविनाश लक्ष्मण शेठ पाटील – नावडेकर ह्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे.

तुम्हाला बातमी वाचून डोळ्यात पाणी आले असेल तर ह्या कुटुंबावर आता काय परिस्थिती असेल ह्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. आधी आई मग वडील आणि आता मुलगा यांचा मृत्यू फक्त नावडे गावाला नाही तर संपूर्ण पनवेल तालुक्याला रडवतोय. कारण पाटील – नावडेकर कुटुंब हे ह्या विभागातील जाणते आणि प्रख्यात कुटुंब आहे.

नियतीचा हा असा खेळ कोणत्याच कुटुंबावर येऊ नये. ह्या कुटुंबातील व्यक्ती कोणत्या आजाराने ग्रस्त होते ही बातमी अजून समोर आली नाहीये.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *