मनोरंजन

सई ताम्हणकरचे तमिळ सिनेमात पदार्पण

सई ताम्हणकर तिच्या हॉट आणि फीट अदाकारी मुले प्रसिद्ध आहे. आपल्या अभिनयाने तीने असंख्य चित्रपटात आपली अदा दाखवली आहे. ह्यात मराठी हिंदी सिनेमाचा सुद्धा समावेश आहे. अमीर खानच्या गझनी सिनेमातून तिने बॉलीवुड मध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनतर मराठी सिनेमांकडे तिने लक्ष घातले आणि आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला.

दुनियादारी सिनेमातून ती लोकांच्या मनात अशी काही बसली की अजून लोक तिच्या त्या लुकवर फिदा आहेत. मराठी सिनेमातून तिने आपला ठसा उमटवला नंतर पुन्हा एकदा हिंदी सिनेमाकडे आपले लक्ष केंद्रित केलं. तिचा नवीनच आलेला चित्रपट मीमी यात तिने शामाची भूमिका केली आहे ही भूमिका प्रेक्षकांना आवडली आहे. तिचा पडद्यावरचा वावर लोकांना जास्त आवडला.

खरतर हे वर्ष सई साठी खूप लकी आहे. आताच मिमी सिनेमाचे कौतुक होत असताना तिने आता एका वेगळ्या भाषेच्या वेब सिरीज मध्ये पदार्पण केले आहे. 6 ऑगस्टला ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. ही वेब सीरिज एक बिग बजेट वेब सिरीज आहे. तिने पहिल्यांदा तामिळ भाषेतील या सीरिज मध्ये काम केले आहे यात ती आपल्याला एका मुलाची आई दाखवली आहे.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता मणिरत्नम यांनी बनवलेली नवरसा ही नऊ कथांची वेब सीरिज आली आहे. तिच्या पहिल्याच भागात तुम्हाला मराठी अभिनेत्री सई ताम्हनकर पाहायला मिळणार आहे. नऊ कथा या वेगवेगळ्या असणार आहेत पण त्याच्यातील भावना ह्या एकाच भावनेशी जोडलेल्या असतील.

सध्या ह्या वेब सिरीजचा इधिरी याचा अर्थ करुणा हा तुम्हाला पाहायला मिळेल. यामधे ती तामिळी सुप्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती याच्यासोबत अभिनय करताना दिसत आहे. शिवाय ती यात त्याच्या पत्नीचा रोल करत आहे. त्याच सोबत साऊथचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज आणि अभिनेत्री रेवती यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत.

ह्या सिनेमात तिच्या वाट्याला फक्त दोन सिन आले आहेत पण त्याच ताकदीने तिने ते पडद्यावर आपला ठसा उमटवला आहे. तिचा ह्या सिनेमातील अभिनय तुम्हाला खूप जास्त आवडेल. नवऱ्याची काळजी करणारी त्याचबरोबर आपल्या बाळाची चिंता करणारी असे हे पात्र सई ताम्हणकर चे तुम्हाला पाहायला मिळेल. नेटफ्लिक्स वर जाऊन तुम्ही हा सिनेमा पाहू शकता. सिनेमा पाहून तिची ही भूमिका तुम्हाला आवडली का हे सांगायला विसरू नका.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *