मनोरंजन

कीर्ती म्हणजेच समृद्धी केळकर माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घ्या

Samrudhi Kelkar biography

सध्याची लोकप्रिय मालिका म्हणजेच फुलाला सुगंध मातीचा ही स्टार प्रवाह वर चालू असलेली मालिका यामध्ये तुम्हाला कीर्ती हे सुनेचे पात्र मनापासून आवडतं असेल. पण खूप कमी लोकांना तिच्या वयक्तिक आयुष्याबद्दल माहिती असेल. तीच नाव आहे समृद्धी केळकर आहे. ह्या आधी तिने मालिका आणि गाण्यामध्ये आपण पाहिलेच असेल.

फुलाला सुगंध मातीचा ह्या मालिकेत सासू आणि सून यांच्यामधील भांडण दाखवले आहे. हे कुटुंब शिर्डी या ठिकाणी वसलेले आहे. शिवाय टिपिकल मोठं कुटुंब दाखवलं आहे. कीर्ती ही शिकलेली सून दाखवली आहे आणि हेच तिच्या सासूला मान्य नाही. बघुया पुढे काय होणार आहे या मालिकेत.

कीर्ती हीचा जन्म ठाणे येथे झाला आहे. याशिवाय तिचे शिक्षण ही ठाण्यामध्येच झाले. उच्च शिक्षण मुलुंड कॉलेज मध्ये झाले आहे. तिच्या वडिलांचे नाव सुनील केळकर आणि आईचे नाव मेधा केळकर आहे. शिवाय तिला एक बहिणही आहे. तिला नृत्य करण्याची आवड असल्यामुळे तिने कथकचे शिक्षण घेतले आहे आणि त्यात तिने विशारद ची पदवी मिळवली आहे.

Samrudhi Kelkar biography
Source : Samrudhi Kelkar Insta

याचं बरोबर तिने लावणी, हीपोप, बॉलिवूड, वेस्टर्न हे नृत्य ही तिने शिकून घेतले आहेत. लक्ष्मी सदैव मंगलंम, पुढचं पाऊल शिवाय ढोलकीच्या तालावर या नृत्य कार्यक्रमात तिने भाग घेतला होता. या स्पर्धेत ती रणरप विजेती ठरली. ह्याच मुळे ती प्रकाशझोतात आली.

क्रुणाल राणे दिग्दर्शित दोन कटिंग या मराठी शॉर्ट फिल्म मध्ये ही समृध्दी अक्षय केळकर सोबत स्क्रीन शेअर करताना दिसली. हीच जोडगोडी नाखवा ह्या मराठी गाण्यामध्ये दिसली. हे गाणं सध्या ऑनलाईन तुफान व्हायरल झालं आहे. ह्या गाण्याला आतापर्यंत वीस लाख लोकांनी पाहिले आहे.

क्रुणाल राणे, समृध्दी केळकर आणि अक्षय केळकर हे त्रिकुट पुन्हा एकदा आपल्या भेटीला एका नव्या प्रोजेक्ट मार्फत येणार आहेत. प्रोजेक्ट चे नाव जरी गुलदस्त्यात असले तरी उत्सुकता मात्र नक्कीच लागून राहिली आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *