बातमी

संदीप महेश्वरी ह्यांनी नाकारली OTT प्लॅटफॉर्म ची १०० कोटींची ऑफर

Sandeep Maheshwari

तुम्हाला जर कुणी १०० करोड दिलं आणि सांगितले हे काम करायचे आहे तर तुम्ही एका पायावर तयार व्हाल. कारण १०० करोड हा आकडा खूप मोठा आहे. माणसाचे संपूर्ण आयुष्य निघून जाईल तरी १०० करोड एवढी मोठी रक्कम कमावता सोडा पाहता सुद्धा येणार नाही. पण आलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने १०० करोडची मोठी किंमत नाकारली आहे. काय आहे ह्या बातमी मागे नक्की जाणून घेऊया.

संदीप महेश्वरी ह्या नावाला परिचयाची गरज नाहीये. तुम्ही टेन्शन मध्ये, डिप्रेशन मध्ये किंवा अन्य कोणत्याही परिस्थिती मध्ये आहात तर ह्या व्यक्तीच्या व्हिडिओ जाऊन पहा. तुम्हाला आपोहु न जगण्याची एक नवीन उमेद मिळेल. गेली अनेक वर्ष लोकांना संदीप महेश्वरी ह्यांनी मोटिवेट केले आहे आणि करत राहतील. तुम्ही आम्ही कधी ना कधी नक्कीच त्यांच्या व्हिडिओ पाहिल्याच असतील.

संदीप ह्यांच्या व्हिडिओ तुम्ही कोणत्या ना कोणत्या सोशल फ्लटफॉर्मवर नक्कीच पाहिल्या असतील. पण शुक्रवारी त्यांनी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केली आणि धक्कादायक माहिती दिली. एका OTT प्लॅटफॉर्म ने त्यांच्या व्हिडिओचे राईट खरेदी करण्याची मागणी केली. ह्या साठी १०० करोडची ऑफर सुद्धा त्यांना देण्यात आली. ह्या कराराने संदीप ह्यांच्या सर्व व्हिडिओ त्या OTT प्लॅटफॉर्म वर अपलोड करून वेगवेगळ्या पद्धतीने दाखवल्या जातील.

पण हा करार संदीप महेश्वरी ह्यांनी नाकारला. ते म्हटले जरी मला १०० करोड काय तर १००० करोड देखील दिले तरी मी माझ्या व्हिडिओ चे राईट कुणालाच देणार नाही. ह्या व्हिडिओ जनतेसाठी मोफत आहेत आणि नेहमीच राहतील. पण माझ्या मनात खूप साऱ्या शंका कुशंका येऊ लागल्या की येणाऱ्या पन्नास वर्षांनंतर जेव्हा माझ्या येणाऱ्या पिढीला कुणी १००० करोड ऑफर केले आणि कुठे साईन करायला सांगितले तर ही ऑफर ते घेऊही शकतात.

म्हणून मी आज हे सर्वांना सांगू इच्छितो की मी मेल्यानंतर जेवढे पण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत ते सर्व पब्लिक डोमेन मध्ये जातील. आणि आयुष्यभर लोकांसाठी फ्री असतील. एकदा का ह्या सर्व व्हिडीओ पब्लिक डोमेन मध्ये येतील तेव्हा पिढ्यानुपिढ्या लोकं ह्या व्हिडिओ फ्री मध्ये पाहू शकतील. शाळा कॉलेज ह्यामध्ये सुद्धा दाखवू शकतील. कुणाचीही परवानगी सुद्धा अशा शाळा कॉलेज ह्यांना घ्यायला लागणार नाही.

पब्लिक डोमेन मध्ये व्हिडिओ गेल्यानंतर कोणतेही प्लॅटफॉर्म पेड व्हिडिओ द्वारे संदीप महेश्वरी ह्यांच्या व्हिडिओ दाखवू शकत नाही. त्यामुळे ह्या व्हिडिओ चा फायदा त्यांच्या कुटुंबीयांनी देखील होणार नाही. खरंच ह्या व्यक्तीला दाद दिली पाहिजे. एवढे खोलवर विचार आणि कृती हाच व्यक्ती करू शकतो. पण तुमच्या मनात एक विचार आला असेल की १०० करोड देऊन OTT प्लॅटफॉर्म ह्यांना काय मिळणार?

तर ह्याचा सर्वात जास्त फायदा OTT प्लॅटफॉर्म ह्यानाच होणार कारण सध्या संदीप महेश्वरी ह्यांच्या चॅनेलवर १.७१ करोड सभासद जोडले गेले आहेत. ह्यापैकी १० टक्के लोकांनी जरी ह्या OTT प्लॅटफॉर्म चे सबस्क्रिप्शन घेतले आणि हे जरी महिन्याला १०० रुपये असले तरी एका महिन्याचे हे OTT प्लॅटफॉर्म वाले २० करोड कमावतील आणि एका वर्षाचे १२० करोड. त्यामुळे ह्यात सर्वात जास्त फायदा हा त्यांचाच आहे.

पण संदीप महेश्वरी ह्यांनी ही ऑफर नाकारून एक उदाहरण जगासमोर ठेवलं आहे. आयुष्यात पैसाच महत्त्वाचा नसतो. माणुसकी आणि आपले काम त्याहून अधिक कितीतरी मोठं असतं. सलाम त्यांच्या ह्या कार्याला. प्रत्येकाची त्यांच्याबद्दल एक कमेंट नक्की करा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *