सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका खूप थोड्या वेळात प्रेक्षकांना आवडू लागली आहे. अत्यंत कमी वेळात तिने प्रेशकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील प्रत्येक कॅरेक्टर ने आपली भूमिका अत्यंत उत्तमपणे साकार केली आहे. त्यातीलच एक कॅरेक्टर म्हणजे सज्जन राव यांची भूमिका नकारात्मक असली तरीही हे पात्र लोकांना हसवणारे म्हणजे एक कॉमेडियन आहे. खरं तर ही कॉमेडी त्याच्या अक्टिंग मध्ये दिसून येते. सज्जन राव हा खर तर नायक नाही पण त्याची ही भूमिका लोकांना खूप आवडली आहे.
सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत सहाय्यक भूमिका असणारा अभिनेता आणि या मालिकेतील अभिनेत्री लतिका हिच्यावर मनापासून प्रेम करणारा अभिनेता म्हणजे सज्जन राव त्याचे खरे नाव आहे संदेश उपशाम. या मालिकेत या सज्जन रावांचे काम अगदीच थोडे होते पण या त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांना इतके आकर्षित केले की लतिका आणि सज्जन राव यांचे लग्न मिळाल्यावर ही सज्जन रावांना या मालिकेत ठेवणे आवश्यक झाले.
सध्या सज्जन राव लतिकेच्या ऑफिस मध्ये तिच्या बॉस च्या भूमिकेत आहे. आणि आपले प्रेम आपल्याला मिळणारच या खोट्या आशेवर जीवापाड प्रयत्न करत आहे. या सज्जन रावांनी अनेक नाटकामध्ये काम केले आहे. करून गेलो गाव, स्पिरिट, पळा पळा कोण पुढे पळे तो गेला उडत, नकळत दिसले सारे, ढॅण्टॅढॅण तसेच अनेक मराठी मालिकांमध्ये ही काम केले आहे. शिवाय बंध नायलॉनचे, पोश्टर बॉईज, इत्तेफाक, क्या हाल मि. पांचाल इत्यादी चित्रपट मध्ये ते आपल्याला पाहायला मिळाले आहेत.

साईबाबा या मालिकेत साई भक्त म्हणून ते आपल्याला दिसले होते ते अभिनय सोबत जॉब ही करत आहेत. ते बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करत आहेत. आणि हो सरकारी नोकरी सांभाळून हा अभिनेता भूमिका ही करत आहे. तर या संदेश उपशाम म्हणजेच तुमच्या आवडत्या अभिनेत्याला सज्जन रावांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या.