मनोरंजन

संकर्षण कराडे ह्यांनी आपल्या जुळ्या मुलांना दिली ही अनोखी नावं

परभणीचा मराठमोळा अभिनेता संकर्षण कराडे ह्याच्या घरी आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. कारण त्याच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. जुळी मुलं म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन गोंडस बाळानी त्यांच्या घरी जन्म घेतला आहे. इथे जुळे मूळ होणे म्हणजे आनंद द्विगुणित होने आहे. 27 जूनला त्याच्या घरात या दोन मुलांचे आगमन झाले आहे.

संकर्षण सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्यामुळे त्याने ही बातमी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर दिली. याशिवाय त्याने आपल्या मुलांची नावे ही चाहत्यांना सांगितली आहेत. त्याचबरोबर फोटो शेअर केले आहेत मुलाचे नाव सर्वज्ञ म्हणजे (सर्व जानणारा) आणि स्रग्वी म्हणजे (पवित्र तुळस) हे मुलीचे नाव ठेवले आहे.

सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोमध्ये तो आपल्या मुलांसोबत आनंदात आहे. अर्थात कोणत्याही बापाला तितका आनंद होतोच शिवाय संकर्षण तर जुळ्या मुलांचा बाप झालंय त्याचा आनंद द्विगुणित असेल सर्व कलाकारांनी त्याला ऑनलाईन शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच त्याने अनेक मालिका सोबत एकांकिका ही केल्या आहेत. शिवाय अभिनेता सोबत चांगला कवी ही आहे. तसेच अनेक शोचे हॉस्टिंग ही त्याने छानपणे साकारले आहे. तसेच झी मराठी वर महाराष्ट्राचा सुपरस्टार या शो मध्ये ती आपल्याला दिसला होता. माझिया प्रियाला तसेच आभास या मालिकांमध्ये काम केले आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *