हिंदीमध्ये आपले हास्य कलाकार म्हणून करियर करणारा हा अभिनेता याचे आत्तच लग्न पार पडले. संकेत भोसले ह्या मराठमोळ्या कलाकाराने अक्षरशः अनेक रिॲलिटी कॉमेडी शो मध्ये आपल्या हास्याचे जलवे लोकांसमोर सादर केले. आपल्या अंगात असलेले कलागुण त्याने असे काही जगासमोर सादर केले की अनेकांनी त्याच्या अभिनयाची वाहवाही केली
गेल्या अनेक दिवसापासून त्याच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर झळकत होत्या आणि ह्या गोष्टीवरून आज पडदा उठला. आज म्हणजेच २६ एप्रिलला सुगंधा मिश्रा हिच्यासोबत त्याने लग्नगाठ बांधली. सुगंधा मिश्रा ही सुधा एक कॉमेडियन आहे. सध्याचा कोरोनाचा काळ बघता त्यांच्या लग्नात नेमके ५० पाहुणे होते. त्यांनी त्यांच्या लग्नाची बातमी सर्वांना इंस्टाग्राम वर सांगितली आहे.

संकेत भोसले चा जन्म मुंबईत झाला. त्याचे शिक्षण एम बी बी एस इतके झाले आहे. म्हणजेच तो पेशाने डॉक्टर तर आहेच पण त्यागोदर उत्तम कॉमेडियन कलाकार आहे तो सलमान खान आणि संजय दत्त यांची मिमिग्री करण्यात एक्सपर्ट आहे. त्याचा पहिला शो बाबा की चौकी, त्यानंतर त्याने बिग एफएम मधे ही काम केले आहे. त्यानंतर कपिल शर्मा शो, नाईट विथ टुब लाईट हे शो केले.
संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा या दोघांची मैत्री अगोदर पासूनच आहे कपिल शर्मा शो मध्ये या दोघांची ओळख झाली. सुगंधा हि उत्तम कॉमेडियन तसेच गायिका आहे. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले पण त्याची खबर त्यांनी कोणाला लागू दिली नाही. २०२० लाच ते लग्न करणार होते पण तेव्हा लॉक डाऊन असल्यामुळे त्यांनी आता लग्न केले. त्यांच्या या लग्नासाठी अनेक कलाकारांनी खूप शुभेछ्या ही दिल्या आहेत.