मनोरंजन

श्रुती मराठे ह्या सिनेमात साकारणार शिवरायांच्या पत्नी, स्वराज्याच्या महाराणी सोयराबाई ह्यांची भूमिका

sarsenapati hambirrao movie cast

मराठी सिनेमा नेहमीच वेगवेगळे विषय हाताळून प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देत असतो. ह्यात ऐतिहासिक सिनेमाचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. लहानपणापासून आपण जो इतिहास वाचत आलोय. हाच इतिहास समोर पाहताना एक वेगळाच अनुभव मिळतो. म्हणून लोकांना असे सिनेमे खूप जास्त आवडीचे वाटतात.

त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर कुणी सिनेमा करायचे ठरवले तरी आपल्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते. मराठी मध्ये अनेक ऐतिहासिक सिनेमे आले आणि लोकांनी त्यांना पसंती सुद्धा दिली. असाच एक सिनेमा प्रवीण विठ्ठल तरडे घेऊन येत आहेत. ज्याचे नाव आहे सरसेनापती हंबीरराव.

वाचूनच अंगावर काटा आला ना? काहींना ह्या सिनेमा बद्दल माहीत असेल तर काहींना माहीत देखील नसेल. हा सिनेमा प्रवीण तरडे ह्यांनी दिग्दर्शित केला आहे तर ह्या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद देखील त्यांनीच लिहिले आहेत. संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम आणि धर्मेंद्र बोरा हे ह्या सिनेमाचे निर्माते आहेत.

हा सिनेमा जून २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता. पण लॉक डाऊन मुळे हा सिनेमा लांबणीवर गेला. अंदाजे हा सिनेमा डिसेंबर २०२० मध्ये प्रदर्शित होईल. ह्या सिनेमात सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार? हे गुलदस्त्यातच आहे. पण ह्या सिनेमात पहिल्यांदाच राकेश बापट हा खलनायकाच्या भूमिकेत आपल्याला पहायला मिळेल.

गश्मिर महाजनी, प्रवीण तरडे, शुभंकर एकबोटे, रमेश परदेशी हे ही ह्या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असतील. कोणता अभिनेता कोणते पात्र साकारणार आहे हे अजून समोर आलं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण असेल हे पाहणे ही तेवढेच उत्साही असेल. पण शिवरायांच्या पत्नी, स्वराज्याच्या महाराणी सोयराबाई ह्यांच्या भूमिकेत आपण श्रुती मराठे हिला पाहणार आहोत.

sarsenapati hambirrao movie cast
Image Source Shruti Marathe Social Handle

श्रृती मराठेला आपण ह्या आधी खूप साऱ्या सिनेमात मालिकेत पाहिले आहे पण महाराणींच्या भूमिकेत पाहायला सर्वांना नक्कीच आवडेल. महाराणी सोयराबाई ह्या सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांच्या बहीण होत्या. त्यामुळे बहीण भावाचं नातं पडद्यावर पाहायला आपण सर्व उत्सुक असणारच.

सरसेनापती हंबीरराव सिनेमासाठी तुम्ही किती उत्सुक आहात? आम्हाला नक्की कळवा. शिवरायांच्या आणि हंबीर रावांच्या भूमिकेत कोण असेल? हे ही आम्हाला सांगा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *