मनोरंजन

इंडियन आयडॉल संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ह्या सिनेमात सायली कांबळेला गाण्याची संधी

महाराष्ट्राची स्टार म्हणजे इंडियन आयडॉल १२ स्पर्धेत टॉप तीन मधे फायनालिस्ट सायली कांबळे हिला लगेचच चित्रपट मध्ये गाणे गाण्याचे आव्हान मिळाले आहे. इंडियन आयडॉल मध्ये तिला उभ्या महाराष्ट्राने इथपर्यंत पोहचवले आहे. तीच कोल्हापूर डायरीज या चित्रपट मध्ये पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली आहे.

या गाण्याच्या सेटवर अवधुप गुप्ते यांनी स्वतः हे गाणे दिग्दर्शन केले आहे ते म्हणाले की, ही महाराष्ट्र चित्रपट सृष्टीची कर्मभूमी आहे ती आम्हा सर्वांसाठीच लकी ठरलेली आहे. सायली इंडियन आयडॉल मध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक गाणं रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली. हा माझ्यासाठी देवाचा आशीर्वाद आहे असे ती म्हणाली.

इतकंच नाही तर भारतातील तमाम चाहत्यांना असे वाटते की भारताला एक अत्यंत गुणी अशी गायिका मिळाली आहे. सायली कांबळे ही हे गाणे गाऊन अत्यंत आनंदी आहे. तिलाही याचा आनंद होत आहे की इंडियन आयडॉलच्या सेट वरून बाहेर पडल्यावर लगेच तिला लगेच गाण्याचा चांस मिळाला. लोकांनी माझं गाणं ऐकाव ही तिची मनापासून इच्छा आहे.

लोकांनी मला ओळखावं आणि माझं संगीत क्षेत्रात करियर व्हावं म्हणूनच मी इंडियन आयडॉलमध्ये गेले होते. याशिवाय अवधूत गुप्ते यांच्यासोबत गाताना तिला जास्त आनंद होत आहे. ती लहानपासूनच त्यांची फॅन आहे. तिने जो राजन यांचेही आभार मानले.

यासाठी ते सर्व श्रेय या चित्रपटाचे दिग्दर्शक जो राजन यांना देतात त्यांनीच ही कल्पना डोक्यात आणली. नवीन चित्रपट “कोल्हापूर डायरीज ” मध्ये हे गाणं आपल्याला ऐकायला मिळेल. या गाण्यात सायली सोबत स्वप्नील बांदोडकर यांनी साथ दिली आहे. बघुया हे गाणे लवकरच गायत्री दातार आणि भूषण पाटील या दोघांवर चित्रित करण्यात येईल. आता बघुया या गाण्यानंतर तिचा जीवनात अजून किती गाणी येतात.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *