सध्या सगळीकडे जो तो लग्न बंधनात अडकताना दिसत आहेत आताच लग्न केले ते आहेत “राजा राणी ची ग जोडी” या मराठी मालिकेतील दादा साहेब म्हणजेच शैलेश कोरडे. आताच विवाहाच्या गोड बंधनात अडकले आहेत. त्यांनी श्रुती कुलकर्णी हिच्याशी विवाह केला आहे. श्रुती ही देखील याच क्षेत्रात नाटक तसेच शॉर्ट फिल्म काम केले आहे.

श्रुती आणि शैलेश यांचे आठ वर्ष प्रेम होतं. त्यामुळे आता त्यांनी या नात्याला एक वेगळं नाव दिलं. कोरोना मुळे जास्त लोकांच्या सानिध्यात लग्न पार न पडता अगदी मोजक्याच लोकात हा सोहळा संपन्न केला. श्रुती बद्दल सांगायचे झालं तर ती अभिनेत्री, लेखिका, गायिका, नृत्तिका आहे.
सर्वच जण आपले लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात त्याचप्रमाणे शैलेश आणि श्रुती या दोघांनीही आपले फोटो शेअर केले आहेत त्यांच्या या फोटो ना चाहत्यांनी अनेक शुभेच्छा दिल्या. अचानक निर्णय झाल्यामुळे आणि कोविडच्या निर्बंध मुळे त्यांचा विवाह सोहळा कमी लोकांच्या उपस्थितीवर पार पडला.

दादा साहेब म्हणजेच शैलेश कोरडे यांनी आपल्या अभिनयाने सर्वांची मने या मालिके द्वारे जिंकली. एक कणखर अभिनेता कसा असू शकतो याचे उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिले. सर्व मराठी कलाकारांनी त्याच्या या नवीन इनिंग साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आमच्या पाटीलही मीडिया कडून सुद्धा त्यांना नवीन आयुष्याच्या प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये शुभेच्छा देऊ शकता.