शरद केळकर याचा उल्लेख जिथे होतो तेव्हा एक परिपूर्ण हुरहून्नरी अभिनेता म्हणून त्याची ओळख होते. भारदस्त आवाज असणारा शरद त्याने अनेक सिनेमात आपला आवाज डब केला आहे तसेच बाहुबली या जगप्रसिद्ध चित्रपटासाठी साऊथचा प्रसिद्ध अभिनेता प्रभास याचा आवाज ही डब केला आहे. आज जो काही आहे तो या क्षेत्रात आहे त्यामागे त्याची मेहनत आणि कष्ट आहेत असेच म्हणायला लागेल.
एकेकाळी खरंच कर्जाच डोंगर अंगावर असल्याने त्याचे खायचे प्यायचे ही वांदे होते. त्यानंतर त्याने मुंबई मध्येच जिम ट्रेनर चे काम केले आहे. लहान असताना शरद हा बोबडा बोलायचा त्यामुळे सर्व मित्र त्याची चेष्टा करायचे. त्यामुळे वैतागून शरद शाळेला दांडी मारायचा पण खरंच आताचा त्याचा भारदस्त आवाज ऐकून त्याचे मित्र ही आश्चर्यचकित झाले असतील.

शिवाय आता तो डब आर्टिस्ट म्हणून ही प्रसिद्ध आहे त्याने मिस्टर इंडिया स्पर्धेत फायनालिस्ट पर्यंत मजल मारली होती. त्यानंतरच त्याला अनेक मालिकांमध्ये काम मिळाले होते. त्याने आक्रोश सिंदूर तेरे नाम का, कुछ तो लोग कहेंगे या हिंदी मालिका मधे काम केले तर रॉकी हँडसम, हलचल, 1920 रिटर्न्स, राम लीला, भूज ( द प्राइड ऑफ इंडिया) लक्ष्मी तसेच तान्हाजी आणि लक्ष्मी बॉम्ब यांसारख्या हिंदी चित्रपट मधे ही त्याचे काम प्रेक्षकांना आवडले आहे.
रितेश देशमुख यांचा लई भारी या चित्रपटामध्ये त्याने नकारात्मक भूमिका केली होती ही भूमिका प्रेक्षकांना भावून गेली. त्याने आपल्या या प्रवासाबद्दल कसा तो यशस्वी ठरला हे सांगितले आहे तो म्हणतो आपल्याला जे धैर्य गाठायचे आहे त्यापासून दूर कधीच जायचे नाही, दुसरं म्हणजे जे काय करायचं मनात आहे त्यासाठी खूप मेहनत घायची. ही गोष्ट तू करूच शकणार नाहीस असा सल्ला देणाऱ्या माणसांपासून नेहमीच दूर रहा.
चिनू, उत्तरायण, राक्षस, माधुरी, अ पेइंग घोस्ट, संघर्ष यात्रा यांसारखे मराठी चित्रपट ही त्याने केले आहेत. येणाऱ्या काही महिन्यात त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.