शेपूची भाजी आपल्यातील बहुतेक जणांना आवडत नाही. ताटात आली की तिला हात ही लावायचा नाही, ही भाजी खाल्यावर तिच्या वासाचे ढेकर येतात. पण ही भाजी खाल्ल्याने इतके फायदे मिळतात हे ऐकुन कदाचित तुम्ही ही भाजी खायची सुरुवात कराल ही आशा आहे.
शेपूची भाजी बनवताना त्यात थोडी मुगाची डाळ दहा मिनिट अगोदर पाण्यात भिजत घालावी आणि कांदा मिरची आणि भरपूर लसूण घालून फोडणी द्या. एकदम चविष्ट लागते ही भाजी करून बघा. आता बघुया शेपूच्या भाजी मधून किती पौष्टीक घटक मिळतात ते.

शेपूची भाजी खाण्याचे फायदे
शेपुच्या भाजीत असे काही घटक असतात ज्यामुळे तुमचे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते त्यामुळे उच्च रक्तदाब ही नियंत्रणात राहते. याशिवाय तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण ही संतुलित राहते त्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांनी शेपूची भाजी खाणे फायद्याचे आहे.
शेपूची भाजी खाणे स्त्रियांसाठी अतिउत्तम आहे कारण स्त्रियांना जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा त्याच्यातील हार्मोन्स कमी जास्त होत असतात. त्यावेळी ही भाजी खाणे योग्य आहे या भाजीमध्ये हार्मोन्स संतुलित राहतात.
शेपूची भाजी खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. ही भाजी खाल्ल्याने पचन संस्था ही मजबूत होते. शेपूच्यां भाजीत कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ज्यांची हाड झिजली असतील कंबर दुखत असेल अशांनी शेपूची भाजी खाणे उत्तम.
पोटाचे विकार आणि किडनीचे विकार यावर गुणकारी अशी ही भाजी आहे. त्यामुळे जरी कितीही वेगळी वाटत असली भाजी तरी ह्या भाजीला खायला सुरुवात करा. तुमच्या शरीरासाठी खूप जास्त आरोग्यदायी आहे.
2 Comments