सध्या सगळ्याच वाहिन्यांवर नवीन मालिका चालू होण्याचा धुडकुस लागला आहे त्यातच सध्या कलर्स मराठी वर ही एक नव्याने चालू होणारी मालिका म्हणजे श्री स्वामी समर्थ होय. या दुनियेत या स्वामींचे भक्त आणि त्यांची श्रद्धा अगणित आहेत आणि श्रद्धा कधीच कमी होणार नाही कारण त्यांची भक्ती जशी अगणित आहे तशीच स्वामी कुठे तरी आहेत हेच सिद्ध होत आहे.
ह्या मालिकेचा प्रोमो टेलि कास्ट झाला आणि स्वामींच्या रूपाचे दर्शन सर्वांना झाले. पण ह्याच रूपामध्ये नक्की कोणता अभिनेता दडला आहे? त्याच नाव काय? असे अनेक प्रश्न स्वामी भक्तांना पडले. आज आपण पाहणार आहोत याचं मालिकेत मुख्य भूमिकेत असणारे स्वामी आणि ह्या अभिनेत्याच्या वयक्तिक आयुष्याबद्दल.
श्री स्वामींच्या या मालिकेत स्वामींच्या या भूमिकेत काम करणारी व्यक्ती ही नक्की कोण आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर ती व्यक्ती आहे अक्षय मुडावदकर ही आहे. अक्षय यांच्या बायकोचे नाव आहे नेहा असे आहे. याशिवाय यांच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच्या अगोदर अनेक नाटकामध्ये काम केले आहे.

गांधी हत्या आणि मी, द लास्ट व्हॉईस रॉय, इडीपस रेस ही त्यांची नाटके होती आणि त्यांना अनेक नाटकात पारितोषिक ही मिळाले होते. याचप्रमाणे त्यांनी मराठी मालिकांमध्ये ही काम केले आहे. स्वराज्य जननी जिजामाता आणि आताची नवीन मालिका म्हणजे श्री स्वामी समर्थ होऊ.
या मालिकेतील त्यांची भूमिका ही महत्वाची तर आहे पण यात त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक होत आहे. प्रेक्षकांना ही त्यांची भूमिका अधिक आवडत आहे. अक्कलकोट येथे स्थित असणारे स्वामी आपल्या भक्तांवर कशाप्रकारे नेहमीच प्रसन्न असतात हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळते. शिवाय वाईट लोकांना तिथेच शिक्षा करणे हे सुध्दा त्यांनी केलेले दाखवले आहे.
तर तुम्हीही बघा ही नवीन मालिका श्री स्वामी समर्थ. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आम्हाला नक्की कळवा की मालिका तुम्हाला कशी वाटते.