मनोरंजन

पुष्पा सिनेमात अल्लू अर्जुनला हिंदीसाठी या मराठी कलाकाराने दिला आहे आवाज

पुष्पा सिनेमाची जेव्हापासून घोषणा झाली आहे तेव्हापासून हा सिनेमा चर्चेचा विषय बनला आहे. सुकुमारचे दिग्दर्शक आणि यात अल्लू अर्जुन रश्मीका मंधाना, फहाद फासिल अशी तगडी स्टार कास्ट. मग सिनेमा किती भव्यदिव्य असू शकतो याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. लॉकडाऊन मुळे हा सिनेमा प्रदर्शनासाठी लांबणीवर गेला. पण सध्याची परिस्थिती पाहता हा सिनेमा १७ डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.

Source Social Media

अल्लू अर्जुनचा प्रत्येक सिनेमा म्हणजे चाहत्यांसाठी दिवाळीच असते. साऊथ क्षेत्रात त्याच खूप मोठं नाव असेल तरी हिंदी भाषिक मध्ये सुद्धा त्याचा मोठा गाजावाजा आहे. त्याचे अनेक हिंदी मध्ये डब केलेले सिनेमे लोकांनी डोक्यावर उचलून धरले आहेत. अशातच त्याचा पुष्पा हा सिनेमा सुद्धा हिंदीमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्याने घेतला आहे.

आज पुष्पा सिनेमाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित झाला. सिनेमाचा ट्रेलर एवढा छान जमून आला आहे की लोकांना हा ट्रेलर खूप जास्त आवडला. अत्यंत कमी वेळात या ट्रेलर ने मिलियन व्ह्यू कमावले. पण या ट्रेलर मध्ये एक गोष्ट तुम्ही नोटीस केलीत का? यावेळी अल्लू अर्जुन याचा ऑफिसियल हिंदी आवाज असणारे संकेत म्हात्रे यांचा आवाज आपल्याला ट्रेलर मध्ये ऐकू येत नाहीये.

सिनेमाचा टिझर जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा संकेत म्हात्रे यांच्या आवाजात तो होता पण आज प्रदर्शित झालेल्या ट्रेलर मध्ये तो आवाज गायब दिसतोय. आणि जो आवाज सध्या कानी पडतोय तो दुसरा तिसरा कुणी नसून बॉलीवूड आणि मराठी क्षेत्रातील मोठं नाव श्रेयस तळपदे याचा आहे. तुम्हालाही धक्का बसला ना? हो पण हे खरं आहे. जाऊन तुम्ही परत एकदा ट्रेलर पहा तुम्हालाही आवाज ओळखू येईल.

Source Shreyas Talpade Social Media Handle

पुष्पा सिनेमाला एक मराठमोळा अंदाज हिंदी डब्बिंग मार्फत दिला आहे. ट्रेलर मध्ये एक दोन मराठी शब्द सुद्धा ऐकू येतात. यात लबाड आणि कावरं बावरं यांचा समावेश आहे. आणि श्रेयस तळपदे याच्या आवाजात हे शब्द जास्त उठूनही दिसतात. पण संकेत म्हात्रे यांचा आवाज नेहमी आपण अल्लू अर्जुन साठी ऐकत आलो आहोत आणि आता श्रेयस तळपदे याच्या आवाजात ऐकणे थोडे वेगळे वाटतेय. पण तरीही श्रेयस यांनी खूप छान हिंदी डब हा सिनेमा केला आहे.

तुम्हाला काय वाटतं अल्लू अर्जुनच्या हिंदी आवाजासाठी संकेत म्हात्रेच हवे होते की श्रेयस तळपदे याचा आवाज छान वाटतोय? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट मध्ये द्या.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *