मनोरंजन

विजय खंडारे याचा पुष्पा या हिट चित्रपट मधील श्री वल्ली या गाण्याचा रिमेक बघितला का

विजय खंडारे हा कोण आहे तर एक कॉमेडियन आहे तो आणि त्याची बायको मिळून दोघेही युट्युबवर कॉमेडी व्हिडिओ बनवताना तुम्ही पहिलेच असतील. या विजय ने पुष्पा चित्रपटातील गाण्याची लोकप्रियता लक्षात घेऊन श्री वल्ली या गाण्याचा मराठी व्हर्जन बनवला आहे. या त्याच्या मराठी गाण्याला सोशल मीडियावर अनेकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

हा पठ्ठ्या मुळचा अमरावती जिल्यातील तिवसा या गावातील आहे. तो आपल्या व्हिडिओ मध्ये व्हराडी भाषा बोलतो आणि त्याची ॲक्टिंग आणि कॉमेडी त्याच्या चाहत्यांना नेहमीच आवडतात. पुष्पा या सुपरहिट चित्रपटातील सर्वच गाणी ही तेलगू, मल्याळम, तमिळ आणि हिंदी अशा वेगवेगळ्या भाषेत डब करण्यात आली आहेत आणि म्हणून त्याने मराठी भाषेत ही हे गाणे मराठी चाहत्यांसाठी आणले आहे.

विजय खंदारे याने स्वतः या गाण्याला आवाज दिला आहे. श्रीनिवास स्टुडिओ अमरावती आणि आदित्य म्युजिक यांनी मिळून हा नवीन मराठी व्हर्जन तयार केला आहे. हे गाणे चित्रीत व्हावे ही त्याची मनापासून इच्छा होती.

महत्वाचं म्हणजे हे गाणे मोबाईल वर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात त्याच्यासोबत त्याची पत्नी तृप्ती खंडारे दिसत आहे. या गावरान गाण्याला संपूर्ण देशातून प्रसिध्दी मिळत आहे. आणि हो गायक आणि गीतकार असे दोन्ही रोल करून रातोरात तो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला.

विजय खंडारे याचे वडील हात गाडीवर एक छोटासा व्यवसाय करतात. शिवाय त्याची आई एक गृहिणी आहे. काही वर्षांपूर्वी हा विजय शेंगदाणे विकायचा त्यानंतर त्याला टिक टॉक वर कॉमेडी करण्याची सवय लागली. टिक टॉक बंद झाल्यावर त्याने सोशल मीडियावर आपले व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली. त्याचे शिक्षण विज्ञान शाखेचा पदवीधर तो आहे याशिवाय त्याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या गाण्याचा मराठी व्हर्जन या पुष्पा सिनेमातील कलाकारांनी ही पहिला आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *