क्रीडा

२६ वर्षाच्या या पुण्याच्या वाघिणीचे आशिया पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत जिंकले चार गोल्ड मेडल

उदयपुर : बुधवार पासून उदयपुर मध्ये सुरू झालेल्या पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप भारताची सुरुवात अगदी सुवर्ण झाली आहे. भारतीय खेळाडू श्रुतीका राऊत हिने एक दोन नव्हे तर चार सुवर्ण पदक जिंकून भारताच्या झोळीत मोठे यश टाकलं आहे. तिच्या या पराक्रमामुळे सर्वकडून तिचे कौतुक होत आहे. पण ही बातमी कोणत्याच न्यूज चॅनलवर दिसत नाहीये ही खंत आहे.

श्रुतीका राऊत ही पुण्याची रहिवाशी असून ती फक्त २६ वर्षाची आहे. एवढ्या कमी वयात तिने आजवर अनेक पदकं आपल्या नावावर कोरली आहेत. तिने आपला खेळ फक्त पुणे किंवा महाराष्ट्र पुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण जगभरात दाखवला आहे. त्यामुळे तिच्या या भरघोस यशाचे कौतुक होत आहे.

पदक जिंकल्यानंतर आपल्या राहत्या घरी पुण्यात तिचे मोठ्या थाटामाटात स्वागत झालं. ढोल ताशा पथक, फटाके आणि लेझिम ने तिचे स्वागत करून तिच्या या पराक्रमाला लोकांनी दाद दिली आहे. सुवर्ण पदकामुळे तरी लोक तिला आता ओळखतील अशी आशा आहे. पण तिने फक्त आताच नाही तर या अगोदर सुद्धा बरीच पदके जिंकली आहेत.

जिल्हास्तरीय गोल्ड मेडल – २०१९, राज्यस्तरीय सिल्व्हर मेडल – २०१९, नॅशनल गोल्ड मेडल – २०१९, आशिया कांस्य पदक – २०१९, आशिया गोल्ड मेडल – २०२१. अशी आजवर तिने सर्वच स्तरावर पदकांची कमाई केली आहे. सर्वांना विनंती आहे की तिच्या सोशल मीडिया पेजवर जाऊन तिला थोड प्रेम द्या, शुभेच्छा द्या. (rautshrutika13)

Source Shrutika raut social handle

आशिया पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप पुरुष गटात सुद्धा ज्युनियर गटात तीन पदकांची कमाई केली. यात टिळक चरण, आर वैद्यनाथ आणि विजय शिंदे याचा समावेश आहे. पाकिस्तान संघाला भारताचा विसा न मिळाल्याने त्यांचे खेळाडू या स्पर्धेत खेळण्यापासून वंचित राहिले.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *