बिग बॉस 13 सिजन मध्ये विजेता ठरलेला ठरलेला सिद्धार्थ त्यानंतर खूप प्रकाशझोतात होता. शहनाज गील बरोबर त्याच कनेक्शन प्रेक्षकांना आवडेल होते. पण सध्या समोर आलेली बातमी खूप धक्कादायक आहे. त्याचे निधन झालं आहे. विश्वास बसत नसेल तरी ही बातमी खरी आहे. कूपर हॉस्पिटल मधून ही बातमी घोषित करण्यात आली आहे.

त्याचबरोबर त्याचे सर्व प्रेक्षकवर्ग ही या बातमी पचवू शकले नाहीत. अचानक हे कसे होऊ शकते हा प्रश्न सर्वानाच पडला आहे. आताच तर आम्ही त्याला बिग बॉस ओटीटी मंचावर पाहिले होते. सदैव हसणारा हा चेहरा काळाच्या पडद्याआड कसा जाऊ शकतो हा प्रश्न सर्वांना पडला आहे. पण रात्री त्याने काही गोळ्यांचे सेवन केले होते ही माहिती समोर आली आहे. याशिवाय त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे गोळ्यांनी घात केला असे म्हणण्यात येत आहे.
मॉडेल अभिनेता असणारा हा हसता खेळता चेहरा अचानक आपल्यातून निघून जाईल असे प्रेक्षकांना वाटत नाहीये वयाच्या तब्बल 40 व्या वर्षी त्याने अचानक एक्झीट घेतली. त्याने रात्री ज्या गोळ्या घेतल्या त्यानंतर सकाळी तो उठलाच नाही तर कूपर हॉस्पिटल मध्ये त्याचे निधन हार्ट अटॅक्ट न झाले हे घोषित करण्यात आले आहे.
सिद्धार्थ हॉस्पिटल मध्ये पोहचण्या अगोदरच मृत झाला होता. याशिवाय ज्या गोळ्याने त्याचा मृत्यू झाला त्या नेमक्या कोणत्या आहेत हे ही कळले नाही आहे. त्याचे पोस्टमॉर्टम अजून झाले नाही आहे. लवकरच सर्व गोष्टी समोर येतील. पण त्याच्या ह्या जाण्याने सिनेजगत पार हळून गेलं आहे.
त्याला बालिका वधू मधून खूप लोकप्रियता मिळाली होती. तसेच बाबुलका आंगण छुटे ना ही मालिका ही केली आहे. बिग बॉस पर्वाचा तो विजेता होता. यानंतर तो यशाच्या सर्वोच्च शिखरावर होता. पण त्याच्या ह्या आकस्मित जाण्याने चाहते फार दुःखी आहेत. त्याचबरोबर संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. सिद्धार्थला त्याच्या चात्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली सोशल मीडियावर वाहिली जात आहे. अनेकांनी त्याच्या घरा समोर गर्दी केली आहे.