हेल्थ

मैद्याचे पदार्थ नेहमी तुमच्या आहारात असतात का? मग वाचा हा लेख

सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात लोकांना फास्ट फूड खाण्यची जास्त इच्छा होते आणि ते खातातही, ब्रेड, बर्गर, वडा पाव, केक, पेस्ट्री, समोसे, नान, रोटी, नुडल्स, पास्ता, बिस्किटे हे सर्व पदार्थ आपण चवीने खातो. पण हे पदार्थ मैद्या पासून बनलेले असतात. त्याचा जरी आपल्या शरीरावर लगेच परिणाम होत नसला तरी हळु हळू याचा परिणाम आपल्या शरीरावर झालेला दिसतो.

मैदा हा तसा बनतो गव्हा पासून मग तुम्ही म्हणाल त्यात कसला आलंय धोका? पण खरंच मैदा चांगला आहे का तुमच्या शरीरासाठी? हे आज आपण पडताळून पाहूया मग तुम्ही ठरवा चांगला की वाईट. मैदा हा गव्हापासून बनतो पण मैदा बनवायची प्रक्रिया म्हणजे तो बनवताना सालीसकट त्याचे फायबर ही काढले जाते. शिवाय तो पांढरा शुभ्र आणि आकर्षक दिसण्यासाठी त्यात ऍलॉक्झनला हे अर्क मिसळले जाते.

पहिली गोष्ट म्हणजे मैद्याचे पदार्थ चविष्ट जरी असले तरी ते खाल्याने आपल्या पोटासाठी म्हणजे पचन संस्थेसाठी हानिकारक आहे. मैद्याचे सतत सेवन केल्याने तुमचा लठ्ठपणा वाढायला सुरुवात होते. यामध्ये जे फायबर असते ते प्रक्रिया दरम्यान काढले जाते. त्यामुळे हा मऊ आणि आकर्षक मैदा खाल्या नंतर तो आपल्या आतड्यांना चिकटून बसतो. आणि मग आपण नको त्या आजारांना आमंत्रण देत असतो.

आपल्या शरीराला रोगप्रतिकार शक्तीची जास्त गरज असते त्यामुळे आपण आजारी पडत नाही. पण जर सतत मैद्याचे सेवन केले तर ही रोग प्रतिकार शक्ती नाहीशी होते. मैदा तयार करताना त्यातील आपल्या शरीराला उपयोगी असणारे फायबर पूर्ण पाने काढले जाते. त्याचा परिणाम आपल्या हाडांवर होतो आपल्या हाडांसाठी उपयोगी असणारे कॅल्शिअम यामुळे हळू हळू नष्ट होतं जाते त्यानंतर आपली हाडे हळू हळू कमजोर होऊ लागतात.

तुम्ही सतत आपल्या शरीरावर मैद्याचा मारा करत राहिलात तर यामुळे तुम्हाला मधुमेह, हृदयरोग, संधिवात, अलझायमर आणि अगदी कर्करोग हे आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे यापुढे मैदा खाताना तो किती खायचा किती नाही हे पूर्णतः विचार करूनच निर्णय घ्या. कारण काही झालं तरी आपल्या आरोग्याचा प्रश्न आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *