हेल्थ

व्हिटॅमिन्स आणि काढ्याच्या अस्तिसेवनाने होणारे दुष्परिणाम आणि रोगप्रतिकारक शक्ती साठी करावयाचे उपाय

काढा

कोरोनावर काढा अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सर्रास काढ्याचं सेवन केलं जातं. त्याच बरोबर शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अनेक लोग व्हिटॅमिन्सच्या सप्लिमेट्स आणि गोळ्यांचं सेवन करत आहेत. व्हिटॅमिन्समुळे कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करणं शक्य होतं. परंतु, व्हिटॅमिन्सच्या ओव्हरडोस शरीरासाठी अत्यंत घातक ठरतो. रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश करणाऱ्या विषाणू किंवा अन्य कोणत्याही गोष्टींना प्रतिकार करण्याची शरीरांतर्गत तयार होणारी क्षमता होय.

रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायामासह आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असणे आवश्‍यक आहे. बदलते हवामान आणि प्रदूषित हवेमुळे अनेक प्रकारचे हानिकारक विषाणू आणि जिवाणू श्‍वसनासोबत आपल्या शरीरात प्रवेश करतात. आपली रोगप्रतिकार शक्ती कमजोर झाल्यावर यांच्यामुळे सर्दी, खोकला आणि अॅलर्जी सारख्या समस्या उद्भवतात. रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश करणाऱ्या विषाणू किंवा अन्य कोणत्याही गोष्टींना प्रतिकार करण्याची शरीरांतर्गत तयार होणारी क्षमता होय. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायामासह आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असणे आवश्‍यक आहे. पौष्टिक आहार न घेतल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन आपण आजारांना बळी पडतो

काढा

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काढा अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचं अनेक तज्ज्ञांनी सांगितलं. अनेकांनी आपल्या दैनंदिन जीवनात काढ्याचा समावेश केला आहे. असं सांगण्यात येत की, काढा फक्त रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करत नाही. तर आरोग्याच्या इतरही समस्या दूर करण्यासाठी काढा फायदेशीर ठरतो. पंरतु, ते म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट… तसचं काहीसं काढ्याच्या बाबतमीत झाल्याचं दिसून येत आहे. काढ्याच्याही अतिसेवनानेही अनेक साइड इफेक्टचा सामना करावा लागतो. अशातच दिवसातून किती वेळा आणि किती प्रमाणात काढा पिणं फायदेशीर ठरतं. हे प्रत्येकाने जाणून घेणं गरजेचं आहे.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, काढ्याचं प्रमाण आयुर्वेदिक शरीरानुसार ठरते. आयुर्वेदात शरीराचे तीन प्रकार सांगण्यात आले आहे. वात, पित्त आणि कफ. त्यानुसार, आपलं शरीरा या तीनपैकी कोणत्यातरी एका प्रवृत्तीचं असतं. याचाच अभ्यास करून शरीरातील दोष, मानसिक अवस्था आणि स्वभाव ओळखण्यास मदत होते.

वात – जर तुमचं शरीर या प्रकारात येत असेल तर काढ्याचं सेवन दिवसातून दोन वेळा करणं फायदेशीर ठरतं. वात प्रकारात येणारे लोकांनी आपल्या काढ्यात थोड्या तुपाचाही समावेश करावा. त्यामुळे शरीरातील कोरडेपणा दूर करण्यास फायदेशीर ठरतं.

पित्त – पित्त शरीर असणाऱ्या लोकांनी काढा दिवसातून एकदाच घ्यावा. त्यापेक्षा जास्त वेळा घेऊ नये. याव्यतिरिक्त त्यांनी अनोशापोटी काढ्याचं सेवन करू नये. पित्त शरीर असणाऱ्या लोकांसाठी काढा पिण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे, संध्याकाळ.

कफ – दिवसातून 2 ते 3 वेळा कफ शरीर असणाऱ्या व्यक्ती काढ्याचं सेवन करू शकतात. अशा लोकांना व्हायरल आजार होण्याची भिती जास्त असते. त्यामुळे काढा त्यांच्या अमृत असतं, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही.

काढ्याच्या अतिसेवनाने होणारे साइडइफेक्ट्स – काढा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करण्याचं काम करतात. त्यामुळे काढ्याच्या अतिसेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होऊन शरीराला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही दररोज काढ्याचं सेवन करत असाल आणि तुम्हाला समस्या जाणवू लागल्या तर समजून जा की, तुम्ही काढ्याचं अतिसेवन करत आहात. जर तुम्हाला नाकातून रक्त येणं, लघवीला त्रास होणं, तोंड येणं (माऊथ अल्सर), पित्त होणं आणि पोटात गॅस होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतं.

काढ्याचं प्रमाण किती असावं? – काढ्याचं सेवन करणाऱ्या लोकांनी काढ्याचं प्रमाणंही मर्यादीत ठेवणं गरजेचं असतं. 50 मिलीलीटर पेक्षा जास्त काढ्याचं सेवन करू नये. 100 मिलीलीटर पाण्यात काढ्यात घालणारे पदार्थ घालून उकळण्यास ठेवा. ज्यावेळी हे पाणी उकळून 50 मिलीलीटर होईल. त्यावेळी त्याचं सेवन करा.

व्हिटॅमिन्स चे अतिसेवन – कोरोनाच्या संकटकाळात जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी डॉक्टर्स शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा सल्ला देत आहेत. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अनेक लोग व्हिटॅमिन्सच्या सप्लिमेट्स आणि गोळ्यांचं सेवन करत आहेत. व्हिटॅमिन्समुळे कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करणं शक्य होतं. परंतु, व्हिटॅमिन्सच्या ओव्हरडोस शरीरासाठी अत्यंत घातक ठरतो.

हेल्थ एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. याच्या सेवनाने डोळ्यांच्या नसांमध्ये फॅट्स जमा होत नाही आणि पेशींचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत होते. परंतु, हे अॅन्टीऑक्सिडंट्सप्रमाणेही काम करतं. जर एखादी व्यक्ती आहारामार्फत व्हिटॅमिन्सचं सेवन करत असेल तर, ते अत्यंत लाभदायक ठरतं. पण जर सप्लिमेंट्स घेत असेल तर मात्र डोळ्यांसाठी घातक ठरू शकतं.

व्हिटॅमिन सी – व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी मदत करते. अनेक फळांमार्फत शरीरात व्हिटॅमिन सी पोहोचवण्यासाठी मदत होते. परंतु, कोरोना काळात अनेक लोक औषधांमार्फत किंवा सप्लिमेंट्समार्फत सेवन करत आहेत. त्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. उल्टी, जुलाब यांसारख्या समस्या व्हिटॅमिन सीच्या अधिक सेवनाने उद्भवण्याची शक्यता आहे.

व्हिटॅमिन डी – व्हिटॅमिन डी जर कोणी सप्लिमेंट्समार्फत घेत असेल, तर व्यक्तीला स्नायूंच्या समस्या उद्भवतात. स्नायूंमध्ये वेदना होणं, किडनी स्टोन यांसारख्या समस्या होतात. व्हिटॅमिन डी नेहमी डॉक्टर्सच्या सल्ल्याने घ्यावं. अन्यथा ओवरडोसमुळे शरीराला नुकसान पोहोचू शकतं. दरम्यान, जगभरात कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने हातपाय पसरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती याबाबत सगळीकडे चर्चा होताना दिसत आहेत. याचं कारणही कोरोना व्हायरसच आहे.

शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा सल्ला वारंवार जागतिक आरोग्य संघटना आणि डॉक्टरांच्या वतीने केला जात आहे. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी आहारातही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांसोबतच डॉक्टर्सही देत आहेत. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डॉक्टर वारंवार ‘व्हिटॅमिन सी’ (Vitamin C) असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला देतात.

 घरगुती पदार्थ वापरून रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचा प्रयत्न करत असाल तर हे उपाय करू शकता – प्रसिद्ध शेफ अनहिता ढोंडी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काढ्याची रेसिपी शेअर केली आहे. हा काढा शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो. ही रेसिपी एका आयुर्वेदीक काढ्याची आहे. घरातच सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांपासून काढा तयार करता येणार आहे. आपल्या घरातील वडिलधारी माणसंही अनेकदा वेगवेगळ्या काढ्यांचे फायदे आपल्याला सांगतात.

अनेकदा काढ्याचा वापर अनेक आजारांवरील घरगुती औषध म्हणूनही केला जात असे. कोरोना काळातही आरोग्य उत्तम राहावं यासाठी अनेकजण घरगुती उपायांना प्राधान्य देत आहेत. काढ्यामध्ये हळद, तुळशीची पानं, वेलची, लवंग यांसारख्या घरगुती पदार्थांपासून काढा तयार केला जातो. आयुर्वेदातही या पदार्थांचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. हे पदार्थ शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात.

आरोग्यासाठी गुणकारी ठरणारा काढा – शेफ अनाहिता यांनी काढा तयार करतानाटा आपला एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. यासाठी हळद, तुळशीची पानं, लवंग, वेलची, काळी मिरी आणि आलं यांसारख्या पदार्थांचा वापर केला आहे. काढा तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करा. त्यानंतर त्यामध्ये हळद आणि आल्याची मिक्सरमध्ये एकत्र करून पेस्ट तयार करून घ्या. पाणी गरम झाल्यावर ही पेस्ट पाण्यात घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये इतर गोष्टी एकत्र करून 15 ते 20 मिनिटांपर्यंत उकळून घ्या. काढा तयार आहे. काढा गरम गरम प्या.

हळदीचं दूध देखील आरोग्यासाठी चांगलं असतं हे तुम्ही अनेकदा वयस्कर लोकांकडून ऐकलं असेच. दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते. हळदी ही अॅंटीबायोटीक म्हणून ओळखली जाते. वजन कमी करणे, जखमेवरील मलम, त्वचेसाठी हळदीचा वापर होतो. मात्र याच हळदीचे दुधाबरोबर सेवन केल्यास त्याचा जास्त फायदा होतो.  आपल्यासाठी फायदेशीर आहे. हळद दुधात एक चिमूटभर मिरपूड ठेवल्यास घसा खवखवणे आणि संसर्ग कमी होण्यास मदत होते. हळदीच्या दुधाचे आणखी फायदे करून घ्यायचे असतील, तर हळदीच्या पावडर ऐवजी कच्ची हळद दुधामध्ये घालून ते दुध प्यावे. झोपण्यापूर्वी तासभर आधी ग्लासभर गरम दूध प्यायल्यास शांत झोप मिळण्यास मदत होते.

रोग क्षमता वाढणारा प्रतीकारक व्हिटॅमिन “सी” – सध्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात आपले हातपाय पसरले आहेत. अशातच कोरोनापासून बचाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा सल्ला वारंवार जागतिक आरोग्य संघटना आणि डॉक्टरांच्या वतीने केला जात आहे. त्यासाठी आहारात व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांसारख्या अनेक घटकांचा समावेश करण्यास डॉक्टरांच्या वतीने सांगितलं जात आहे. अशातच अनेकदा डॉक्टर्स आणि आहारतज्ज्ञांकडून ‘व्हिटॅमिन सी’चा उल्लेख सतत केला जात आहे. पण तुम्ही विचार केला आहे का? आपल्या शरीराला व्हिटॅमिन सीची गरज का असते आणि व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी कोणते मुख्य स्त्रोत कोणते? तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिटॅमिन सी (Vitamin C)ला एस्कॉर्बिक अॅसिड असं म्हटलं जातं. शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास शरीराला अनेक आजारांचा आणि समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे व्हिटॅमिन सीचा आहारात समावेश करून शरीराच्या समस्या दूर करणं शक्य होतं.

व्हिटॅमिन सी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. हे हाडं, त्वचा आणि रक्त वाहिन्यांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतात. याचं प्रमाण कमी झाल्यामुळे रक्ताची कमतरता, हाडांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं. अनेक संशोधनांमधून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, व्हिटॅमिन सी सूर्याच्या प्रखर किरणांमुळे त्वचेला होणाऱ्या नुकसानापासून बचाव करतं. त्वचेचा कोरडेपणा कमी करतं. तसेच त्वचा तजेलदार करण्यासाठीही मदत करतं. डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठीही व्हिटॅमिन सीचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

शरीराला व्हिटॅमिन सी पुरवण्यासाठी काय कराल? – फळं आणि भाज्या व्हिटॅमिन सीचा मुख्य स्त्रोत आहे. संत्री, लिंबू, ब्रॉकली, स्ट्रोबेरी, आवळा, पेरू, किवी यांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. ICMRच्या गाइडलाइन्सनुसार, दररोज कमीत कमी मिलीग्राम व्हिटॅमिन सीचं सेवन करणं गरजेचं आहे. दरम्यान, वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या लोकांसाठी हे प्रमाण बदलू शकतं. मानवी शरीरात व्हिटॅमिन सी तयार होत नाही, तसेच साठवूनही ठेवता येत नाही. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरंत.

व्हिटॅमिन सी युक्त फळे – विविध संक्रमित रोगांपासून बचाव करण्यासाठी जीवनसत्त्व क चे सेवन करणे फायदेशीर ठरते. लिंबू, आवळा, संत्री या फळांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व क आढळते. जीवनसत्त्व क मुळे वेगवेगळ्या रोगांशी लढण्याची शक्ती शरीरास मिळते, सोबतच हाडेही मजबूत होतात. हृदयासंबंधी आजारांवरही जीवनसत्त्व क फायदेशीर आहे.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय

आवळा – आरोग्यवर्धक फळ म्हणून आवळ्यास ओळखले जाते. आवळा खाण्यामुळे शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. नियमित स्वरूपात आवळा रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व क असते. निरोगी आरोग्यासाठी आवळा चूर्णाचे मधासह सेवन करावे.

संत्री आणि मोसंबी – संत्री आणि मोसंबी ही अत्यंत गुणकारी फळे आहेत. मोसंबीमुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते. मोसंबीमध्ये जीवनसत्त्व क मुबलक प्रमाणात असल्याने शरिरातील अशक्तपणा दूर होतो. शारीरिक काम करणाऱ्यासाठी मोसंबीच्या ज्यूसचे सेवन फायदेशीर ठरते. या फळांना अँटिऑक्सिडंट्स चा एक उत्तम स्रोत मानले जाते. याच्या सेवनामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रित ठेवली जाते.

लिंबू – लिंबू एक बहुगुणी आणि औषधी फळ आहे. लिंबाचा रस, साल हे सुद्धा उत्तम आरोग्यासाठी आणि विविध सौंदर्य उपचारांवर गुणकारी आहे. लिंबामधील ॲंटीबॅक्टेरिअल आणि ॲंटीऑक्सिडंट गुणधर्म रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. लिंबाच्या नैसर्गिक ॲंटीसेप्टीक गुणधर्मामुळे ते त्वचा संबंधित समस्यांवर फार गुणकारी ठरते.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *