पुरेशी झोप न मिळाल्यामुळे अनेक व्याधी निर्माण होतात, शरीराचे चक्र बिघडते. आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची आहे, हे समजूनही योग्य प्रमाणात झोप घेतली जात नाही. त्यामुळे झोपेचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. हल्लीच्या धावपळीच्या काळात आरोग्यविषयक अनेक तक्रारी समोर येताना दिसत असतात. तरुण वयातच चष्मा लागणे, मधुमेह , सांदेदुखी झोप न लागणे आशा अनेक व्याधी ठान मांडून बसतात. पुन्हा त्यांना घालवण्यासाठी प्रयत्न करूनही ते साध्य होत नाही. तर आज आपण अशाच झोपेच्या आरोग्याविषयी जाणून घेणार आहोत.
जास्तीत जास्त आरोग्याकडे लक्ष द्याल तेवढेच विकार दूर राहतील. झोप हा प्राणी जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. नॉरइपिनेफ्रिन मेंदूमधील बहुतेक भाग आपण जागे असता कार्यक्षम ठेवते. मस्तिष्कस्तंभाच्या तळाशी असलेल्या काहीं पेशीनी पाठविलेल्या संवेदामुळे झोप येण्यास प्रारंभ होतो. जागे राहण्यासाठी आवश्यक असलेल्या चेतापेशींचे कार्य तात्पुरते थांबते. अशा वेळी जागे राहणे अशक्य होते. या वेळी रक्तामध्ये अडिनोसिनचे प्रमाण वाढते झोप यायला लागली आहे असे आपण अशा वेळी म्हणतो. झोप न लागणे याचा परिणाम झोपणे आणि जागे होणे या दोन्ही क्रिया चेताउद्भवी रसायनामुळे घडत असल्याने आहार, औषधे यामुळे झोपेवर परिणाम होतो.
कॉफी, नाक मोकळे ठेवण्यासाठी घेतलेली नाकात घालण्याची औषधे यामुळे झोप लागत नाही. ब-याच ताण कमी करणा-या औषधामुळे रेम झोपेवर परिणाम होतो.रेम झोपेचा कालावधि कमी होतो. अति धूम्रपान करणा-या व्यक्तीमध्ये झोप अत्यंत कमी असते त्यांच्या रेम झोपेची वेळ सुद्धा कमी असते. धूम्रपान करणा-या व्यक्तींची तीन ते चार तासानी झोपमोड होते. निद्रानाश झालेल्या व्यक्ती झोप येण्यासाठी मद्यपान करतात. मद्यपान करणा-या व्यक्तीमधील झोप पहिल्याआणि दुसऱ्या अवस्थेतील असते.
रात्री झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. उदा.दुस-या दिवशी महत्वाची मिटींग असणे, क्रेडीट कार्डचे भरमसाठ बिल येणे, वैवाहिक जीवनातील समस्या, वेळेअभावी दुर्लक्षित झालेली कामे अशी झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. या सदरात आपण झोप न लागणे याची कारणे आणि त्याचे दुष्परिणाम पाहणार आहोत.

शारीरिक व मानसिक बदल – मुलं वयात येताना त्यांच्या शरिरात अनेक प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया होत असतात, त्यात हार्मोन्स मध्ये बदल होणे. शारिरीक जडण घडण आणि अशा अनेक गोष्टी घडतात ज्याने मुलांचे लक्ष विचलित होऊन ते निद्रानाशाचे शिकार होतात. संशोधकांना वयात येणा-या मुलींमध्ये मानसिक व शारीरिक बदलांसोबत निद्रानाश होण्याचे लक्षणही आढळून आले आहे. पौडांगवस्थेत मुलींमध्ये झोपेच्या समस्या या त्यांच्यामध्ये होणा-या हॉर्मोनल बदलामुळे निर्माण होतात.एका संशोधनानूसार निद्रानाशाची समस्या मुलींच्या मासिक पाळी सुरु होण्याच्या काळात म्हणजेच ११ ते १४ या वयात दिसून येते. तर एका संशोधनानूसार मासिक पाळीच्या काळात मुलींमध्ये हे प्रमाण २.७५ पट वाढलेले आढळले आहे. मुलांमध्ये या प्रकारचा निद्रानाश बऱ्याचदा वयोमानानुसार बदलतो. हळूहळू गोष्टी पूर्ववत होतात, मात्र चुकीच्या सवयी अंगिकरल्यास मात्र निद्रा न येणे हा विकार होऊन बसतो.
अन्य आजार आणि जीवनशैली – कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झोपेची समस्या दिसून येतात. कर्करोगावरील उपचारांची कमतरता,पुन्हा कर्करोग होण्याची भीती, मानसिक अस्वास्थ्य ,कर्करोगामुळे कार्यक्षमता कमी होणे, सुरक्षेच्या समस्या, औषधांचा गैरवापर व दुरुपयोग, नातेसंबधातील ताण, उपचारांसाठी होणारा खर्च यामुळे झोप कमी लागण्याची समस्या निर्माण होते. फक्त कर्करोग च नाही तर अन्य सगळ्याच आजारांमध्ये रुग्णाच्या मनात भीती आणि काळजी ने घर केलेले असते त्यानेच झोपन येणे ही देखील एक व्याधी बनते.कॉर्पोरेट जगातील ताणामुळे देखील तुम्हाला झोप कमी येण्याची समस्या होऊ शकते. दिवसभरातील कामाच्या ठिकाणी असणारा ताण, रात्री उशीरापर्यंत काम करणे, खुप वेळ टीव्ही पहाणे, सकाळी लवकर उठावे लागणे व पुन्हा रात्री एखाद्या पार्टीला जाणे, रात्रभर व्हॉट्सअपवर गप्पा मारणे यामुळे झोप कमी मिळते
मोबाईल गजेट्स किव्वा स्क्रीन वर वेळ घालवणे – ही गोष्ट तर सर्वश्रुतच आहे की डिजिटल स्क्रीन समोर जास्त वेळ बसल्याने झोपेचा त्रास होतो. रात्री झोपताना फोनचा वापर कमी करावा. बराच वेळ फोनचा वापर करून झोपण्याचा प्रयत्न केल्यास लवकर झोप लागत नाही. त्या साठी प्रखर प्रकाश डोळ्यांवर सरळ पडू देऊ नये. त्याने डोळे कोरडे पडतात परिणामी चष्मा लागणे, डोके दुखणे वगैरे गोष्टी चालू होतात.स्मार्टफोन्स आणि कॉम्प्युटर यामधून निघणार्या कृत्रिम प्रकाशामुळे झोपेमध्ये व्यत्यय येतो. संशोधकांनुसार डोळ्यांच्या पेशी कृत्रिम प्रकाशाच्या संपर्कात आल्यास शरीराचे जैविक घड्याळ चुकते, त्यामुळे आपले दैनिक चक्र बिघडते. त्याचा परिणाम अर्थातच आरोग्यावर होतो.
मोबाईल गॅजेस्ट किव्वा अन्य गोष्टी यांचा मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सर्वांनाच माहीत आहेत. आपल्या दिनचर्येत बदल करून आपण निरोगीआयुष्य जगू शकतो.झोप ही शरीरासाठी आवश्यक आहेच; पण ती आपल्याला वरदान आहे. मात्र, धावपळीच्या जगाचा प्रभाव कशावर पडला असेल तर झोपेवर. झोपेच्या वेळा बघडल्या आहेत. आपल्या स्मरणशक्तीसाठी किंवा मेंदूच्या इतर कार्यासाठीसुद्धा शांत व पुरेशी झोप आवश्यक असते. शरीराच्या अवयवांना आणि मेंदूला ताजेतवाने ठेवण्यासाठी शांत, पुरेशी झोप आवश्यक आहे
काही सोपे उपाय
- 1- झोपण्यापूर्वी जास्त जेवण करू नये. जास्त जेवल्यास शरीराचे तापमान वाढते आणि झोपही येत नाही. याचा अर्थ असा नव्हे की, तुम्ही कमी जेवण करावे. रात्रीच्या जेवणानंतर केळी खाणे चांगले राहील. केळीत ट्रिपटोफोन नावाचे अँमिनो अँसिड आढळून येते. हे आम्ल शरीरात सेरोटोनिन हार्मोनच्या उत्सर्जनासाठी सहाय्यभूत आहे. ते मेंदू आणि शरीर शांत करते. चहा-कॉफीचे सेवनही कमी करावे.
- 2- रात्रीच्या वेळी तीव्र प्रकाश असल्यास झोप येत नाही. खरे तर कमी प्रकाशात मेलाटोनिन नावाच्या हार्मोनचा स्राव होतो. या हार्मोनमुळेच झोप येते. प्रकाश कमी ठेवावा.
- 3 – मानसिक तणाव, अति थकवा, पोट खराब असणे, दिनचर्या अयोग्य असणे, झोपण्या उठण्याच्या, खाण्यापिण्याचा निश्चित वेळा नसणे. ही झोप न येण्याची कारणं आहेत. म्हणून या गोष्टी टाळा..
- 4- रात्री कोमट दूध प्यावे. पुदिन्याची पाने पाण्यात उकळून प्यायल्यास त्याने शांत झोप लागते.
झोपेच्या आरोग्यासाठी –
जड पदार्थ खाणे टाळा. ह्रदयात जळजळ होत असल्यास शरीराचा वरच्या भागाखाली उशी घ्या. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. मधूमेह-रात्री अंगाला घाम येणे, वारंवार लघवीला होणे, पाय दुखणे, रक्तात साखरेचे प्रमाण कमी असणे या मधूमेहातील समस्येमुळे रात्री कमी झोप लागते. या समस्येमध्ये टॉन्सिल्सची वाढ अथवा घशातील मांसल भागात वाढ झाल्याने श्वसनसमस्या निर्माण होतात.यामध्ये घोरणे, थकवा, कमी झोप, लक्ष देणे अथवा एकाग्र करणे यामध्ये समस्या होणे ही लक्षणे आढळतात.
लघवीची समस्या- या विकारात लघवीसाठी वारंवार उठावे लागते. वयस्कर लोकांमध्ये हार्टफेल, मधूमेह, मूत्रमार्गातील इनफेक्शन, यकृताच्या समस्या,यामध्ये घेण्या-या औषधांमुळे त्या रुग्णांना, तसेच ड्रग्ज घेणारे लोक अशा लोकांना ही समस्या अधिक जाणवते.डॉक्टर 7-8 तास पूर्ण आणि आरामदायक झोपेची शिफारस करतात. परंतु आपणास माहित आहे की चांगली झोप मिळण्यासाठी चांगल्या पोझिशनवर झोप घेणे महत्वाचे आहे. झोपेच्या पोझिशनचेही आपल्या आरोग्यावर बरेच परिणाम होतात. झोपण्याच्या कोणत्या पद्धती आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत या ही बाबी जमतील तशा लक्षात घ्या.
मन शांत ठेवा. मनात येणारे वाईट विचार काढून टाका, दिवसभरात ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्याविषयी विचार करावा. रात्री जेवल्यानंतर 10 मिनिटे शतपावली अवश्य करावी. त्यामुळे झोप चांगली येईल. संध्याकाळी योगासने केल्यास झोप चांगली लागण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक साधने झोपण्यापूर्वी लांब ठेवून द्यावीत. चांगले संगीत ऐका आणि चांगली पुस्तके वाचा. त्यामुळे झोप येण्यास मदत होईल. शक्यतो रात्री बाहेर जेवणे टाऴावे. हलका आहार घेणे उत्तम.पहाटे लवकर उठून योगासने आणि व्यायाम केल्यास आरोग्य उत्तम राहते.