संग्रह

अबब सापांविषयी आपण आजपर्यंत जे काही ऐकलं ते सर्व खोटं आहे?

snake

नाग पंचमीला नागांची पूजा केली जाते, आपल्याकडे तर नागपंचमीला नाग दूध पितो असा समज तर सर्वश्रुत आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का नागांविषयी अनेक समज गैरसमज आपल्याकडे प्रचलित आहेत याच अशाच गैरसमजांवरचा पडदा काढण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. साप म्हणजे मरण ही कल्पना लोकांच्या मनात इतकी खोलवर रुजली आहे की, साप म्हणताच अनेकांचे अवसान गळते. 80% लोकं तर साप चावला या भीतीनेच अर्धमेल्या अवस्थेत पोहोचतात, बऱ्याचदा बिनविषारी साप ही प्रतिकार करत चावा घेतात काही लोकं तर साप चावला या भीतीने हृदयविकाराच्या झटक्याने मरतात. प्रत्यक्षात शरीरात विष ही नसते फक्त भितीपोटी मृत्यू ओढावतो.

परंपरागत लोककथा, कहाण्या, गूढकथा, भ्रामक भाकडकथा आणि शास्त्रीय माहितीविषयी अज्ञान या सर्व कारणांमुळे निरुपद्रवी सापाला शत्रू ठरवून मृत्यूदूत बनविले आहे.  खरं तर तो फक्त आणि फक्त प्रतिकार करण्यासाठीच चावा घेतो.म्हणजे त्यालाही त्याच्या जीवाची भीती असतेच तर…तर अशाच काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. दुसरा एक गैरसमज म्हणजे म्हताऱ्या सापाच्या अंगावर केस असतात, तोही चुकीचा आहे. सस्तन प्राण्याच्या अंगावर केस असतात, सरपटणाऱ्या नाही. तुम्ही बारकाईने जर निरीक्षण केले तर सरपटणाऱ्या सर्वच प्राण्यांची त्वचा रबरा सारखी असते.त्यावर केस तर अजिबात नसतात, जस्ट विचार करून पाहिला तरी लक्षात येतं की जर केस असतील तर त्याचा त्यांना त्रास किती होईल.. म्हणजे ही गोष्ट त्यांच्या हालचाली साठी महत्त्वाची आहे.

साप ठराविक दिवसांनी कात टाकतात. त्याची कात व्यवस्थित न निघाल्यास पांढऱ्या केसांसारखी दिसते. कदाचित त्यालाच सापाच्या अंगावर केस आहेत असे म्हणत असतील. साप पुंगीवर डोलतो, हा एक चित्रपटामुळे समाजात पसरलेला गौरसमज. मुळात सापाला कान नसतात मग तो ऐकणार कसे, साप सरपटणारा प्राणी असल्याने बाहेरील आवाज तो त्याच्या त्वचेद्वारे फील करतो. त्याच्या त्वचेची रचना देखील अशाच प्रकारची असते. सापाविषयी अनेक अंधश्रद्धा प्रचलित आहेत. साप डूख धरतात. या समजूतीला काहीही शास्त्रीय आधार नाही. कारण साप हा मुळात डोक्याचा भाग कमी असणारा प्राणी आहे म्हणजे मानसा प्रमाने त्याच्या काही लक्षात राहने तर सोडाच अगदी पंधरा मिटांनपर्यंत सुद्धा तो काहीही लक्षात ठेव शकत नाही.

म्हणजे थोडक्यात सापांची गजनी मेमरी असते मग ते लक्षात ठेणार कसे ? याच कारणामुळे सापांना काही शिकवता येत नाही आपण कुत्र्यांप्रमाणे जर शिकवायचा प्रयत्न केलाच तरी त्याच्या काडीचं काही लक्षात राहत नाही मात्र गारुडी करून दाखवतात ते खेळ अन्नाचं अमिश दाखवून केले जातात. तुम्ही कितीही प्रेमाने घरात साप पाळला तर तो फक्त तुम्हाला ओळखू शकेल ज्याने तुम्हाला दंश करण्याची त्यांची मानसिकता तेवढी कमी होईल मात्र तो पाळीव तर अजिबात नाही. वेळ आल्यावर त्याचा चावा निश्चित पण याच कारणामुळे सर्प प्रजाती जरा जास्तच कुप्रसिद्ध आहे. अनेक प्रजाती माणसाने गैरसमजातून नष्ट केल्या आहेत.

 सापाचे विष मंत्राने आणि काही प्रकारच्या जडीबुटीने उतरते, या घातक अंधश्रद्धेपायी देशात दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात. निव्वळ आंधश्रद्धेमुळे हजारो लोकं मृत्युमुखी पडले आहेत. सापाच्या विषावर प्रतिसर्प विष हेच एकमेव औषध आहे. अनेक लोक आपल्याकडे सापाच्या विषाची तोड आहे असे सांगतात मात्र यात कुठलेच तथ्य नाही,कारण यातल्या कुठल्याच औषधांचा परिणाम होत नाही पण हा हे औषध दिल्या नंतर जर तो व्यक्ती मनाने निर्धास्त झाला तर त्याचे बरे होण्याचे चान्स 80% वाढतात.

म्हशीच्या पायाला विळखा घालून धामण दूध पिते, किंवा साप दूध पितो, असाही एक गौरसमज आहे. असे कधीही होत नाही आणि कुणी पाहिले ही नाही, दूध हे सापाचे नैसर्गिक अन्न नाही. दूध हे सस्तन प्राण्याचे अन्न आहे. साप हा सस्तन नाही तर सरपटणारा प्राणी आहे. त्यामुळे दूध पिणे तर सोडाच जर तुम्ही त्याला दूध पाजयचा प्रयत्न केला तर ते दूध त्याच्यासाठी विष आहे हे लक्षात घ्या. साप अक्षरशः तडफडून मारतो.

त्यानंतर सापांविषयी अजून एक अफवा, नागमनी नावाचा प्रकार असतो जो मिळाला की माणूस लखपती होतो, त्यानंतर इच्छाधारी साप वगैरे किंवा पुनर्जन्म झालेले मानवरूपी साप अशाही अफवा गप्पांद्वारे रंगवल्या जातात. पण याला काही शास्त्रीय आधार नाही.  हरणटोळ जातीचा साप  टाळू फोडतो असाही काही लोकं म्हणतात. खरं तर हरणटोळ हा साप खूप नाजूक असतो आणि तो झाडावर आढळतो, खालून एखादा प्राणी चालला असला तर सर्वात वर त्याचं डोकं असते त्यामुळे तो साप डोकं फोडतो असा समज झाला असावा. रात्री शीळ घातल्यावर साप घरात येतो, असाही समज आहे, मात्र सापाला कानच नसतात, त्यामुळे तोही खोटा आहे.

शीळ घातला तरी त्याला घंटा ऐकू येत नसेल तर तो येईल कसा..?? साप चावल्यास मिरची किंवा कडुनिंबाचा पाला खायला दिल्यास तो गोड लागतो, याला मत्र शास्त्रीय कारण आहे. विषारी साप चावल्यावर माणसाच्या संवेदना कमी झालेल्या असतात. शरीरात विष पसरलेलं असत,त्यामुळे त्या व्यक्तीला कुठलीच  चव कळत नाही. आपल्या अशा अनेक अंधश्रद्धा आणि मुर्खपणामुळे सापाच्या अनेक जाती नामशेष झाल्या आहेत.  मांडूळ जातीच्या सापाच्या शरीरात हाडे नसतात, असे म्हटले जाते. हे ही खोटे , कोणताही साप घ्या त्याच्या अंगात खंडीभर हाडे सापडतील. मांडूळ दिसायला चांगला गुटगुटीत आणि चोपडा दिसतो त्यामुळे हा समज असावा बहुतेक.

प्रत्य़क्षात सर्वच जातीच्या सापांच्या शरीरात दोनशे ते चारशे बरगडया असतात. त्यानंतर सापाला केवडा, रातराणीचा वास आवडतो, असे म्हणतात, तेही चुकीचे आहे. आपल्या सारखी वास घेण्याची त्याची क्षमता एवढी विकसित नाहीच मुळी. केवड्याचे वन काटेरी असून अंधारी असते. सरपटणाऱ्या प्राण्यांना अशा जागा जास्त सुरक्षित वाटतात यामुळे जास्त वेळ अशाच ठिकाणी सापांचा वावर दिसतो. आणि केवड्याचे कणीस खाण्यास उंदीर येतात आणि उंदीर सापाचे भक्ष्य असल्याने साप तेथे येतात. त्यामुळे आपल्याला वाटत की साप त्या केवड्याच्या झाडांमुळेच आला आहे की काय सापाला पापण्या नसतात. त्यामुळे तो डोळे मिटवू शकत नाही. त्यामुळे तो एकटक पाहत असतो , त्यामुळे मोहिनी विद्या वगैरे गैरसमज पसरविले जातात.सापाच्या डोळ्यात पाहिलं की माणूस भुलतो वगैरे  सगळ्या भाकडकथा आहेत.

 नागपंचमीच्या दिवशी सापाची पूजा केली जाते आणि इतर दिवशी मात्र तो उपद्रवी म्हणून त्याला ठार केले जाते. आपल्याकडे अगदी पूर्वीपासून सापांची पूजा केली जाते खरी मात्र तरीही सापांच्या कित्येक प्रजाती दुर्मिळ झाल्या आहेत आणि आता उरलेल्या देखील दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहेत. योग्य काळजी घेतली जात नाही आणि दुसरे म्हणजे कुठे साप आढळलाच तर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्या पेक्षा मारून टाकणे जास्त सोपे समजले जाते. माणसाची मानसिकता कधी बदलणार देव जाणे मात्र सध्या तरी त्यांच्याही नैसर्गिक हक्कांवर आपण बंदी आणत आहोत हे ही तितकेच खरे.त्या मुळे शक्य तो आपण आपल्या परीने त्यांच्या अस्तित्वावर धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेऊया.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *