मनोरंजन

Sneha Mahadik बद्दल बरच काही

Sneha Mahadik

स्नेहा दयाराम महाडिक ह्यांच्या बद्दल आपण सर्वच जाणून आहोत. तुम्ही त्यांची अनेक गाणी आजवर ऐकली असतील. तुम्हाला तोंडपाठ देखील असतील पण काही अशीही गाणी असतील ज्या गाण्यामध्ये त्यांचा आवाज आहे? हे तुम्हालाही माहित नसेल. आज आम्ही त्यांची मुलाखत घेतली आहे.

लहानपणी खेळाची (मैदानी खेळ- कबड्डी,खोखो, डोजबॉल) खूप आवड होती. नृत्यकलेत प्रशिक्षण घेतलं होतं.कौटुंबिक पार्श्वूमी संगीताची नसल्यामुळे या क्षेत्रात येईन असा विचार सुद्धा केला नव्हता. आई बाबा आजोबा यांना गाणी ऐकायची आवड होती. तशीच मला सुद्धा होती.

Sneha Mahadik

गाणी गुणगुणनं एवढंच माहीत होतं. योगायोगाने शालेय परीक्षेत संगीताच्या बाईंनी तासाला गाणं म्हणायला सांगितल्यावर भजन गायलं. जे बाईंना फार आवडलं त्यांनी दुसऱ्याच दिवशी पालकांना बोलावून घेतलं आणि आणि मला संगीतात पुढे प्रशिक्षण द्यावे हा विचार मांडला.

त्यानंतर शालेय उपक्रमांमध्ये गायनाची संधी मिळत गेली ज्याने आत्मविश्वास वाढत गेला. जिल्हास्तरीय गायन स्पर्धांमध्ये भाग घेत गेले. ज्यात यश मिळत गेला. स्टेज कॉन्फिडन्स वाढला. त्यानंतर मी शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला लागले. श्री मुकुंद जोग गुरुजींकडे. पुढे १० वी आणि नंतर १२ वी या दरम्यान मी पूर्णतः संगीत शिक्षण आणि स्पर्धा यांपासून सुट्टी घेतली आणि १२ वी नंतर या क्षेत्रात काम करायला पुन्हा नवीन सुरुवात केली. सोशल मीडिया वर गाणी टाकत होते ज्याने मी माझी कला सादर करू शकत होते.

Sneha Mahadik

का संधीच्या अपेक्षेने तसेच मी १ मिनिटांचे कव्हर साँग्ज तयार करून इंस्टाग्राम वर टाकायचे आणि त्यातूनच एका स्पर्धेत ओळख झालेल्या एका मित्राकडून मला गाण्यासाठी विचारलं गेलं आणि मला व्हिडिओ साँग्ज मधे (कोळी) गाण्याची संधी मिळाली.

संगीत व्हिडिओ

  1. गोमू माहेरला जाते हो नाखवा
  2. सखे तोरा तुझा
  3. तुझी याद गो
  4. आई माऊली
  5. इश्क पिरमानं रंगलाय
  6. माझा पिल्लू
  7. लाजिरा

तसेच ‘मुस्कान’ (स्टार भारत), प्यार की लुक्का छुपी (दंगल) (शीर्षक गीत) या हिंदी मालिकेतही गायिले आहे.

Sneha Mahadik

या आधी सुद्धा छोटी मोठी गाणी गायचे पण गोमू माहेरला जाते माझ पहिलं गाणं होतं ज्याला करोडो व्ह्यूज मिळाले. आणि नंतर एका मागोमाग एक चांगली गाणी मिळत गेली. माझं पिल्लू गाण्याने खूप प्रेम दिलं आणि ओळख दिली.

सुरुवातीला संधी मिळणं ही मोठी गोष्ट होती. त्यामुळे आपण गायलेल्या गाण्यांचे मानधन मिळेल ही अपेक्षा सुद्धा नव्हती. मुस्कान या स्टार भारत चॅनल वरच्या सीरिअलचे टाईटल साँग गाण्याची संधी मिळाली त्यातून मला माझे हक्काचे आणि कष्टाचे पाहिले मानधन मिळाले.

अजूनही खूप नवीन कलाकारांशी ओळख होते आणि सर्वांकडून खूप काही शिकायला मिळते आहे. मराठी हिंदी आणि इतर भाषांमध्ये पार्श्वगायन करण्याचं स्वप्न आहे. वेगवेगळ्या भाषा शिकायची इच्छा आहे आणि विविध भाषांमध्ये गाणी गायची आहेत.

Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *