हेल्थ

काही सोप्या गोष्टी ज्यांचा वापर करून दैनंदिन जीवनात करून आपण आपलं आरोग्यअबाधित राखू शकतो

सध्याच्या धावपळीच्या काळात प्रत्येक जण आरोग्याच्या दृष्टीने काहीसा चिंतीत असतो. कुणाला वजन वाढले म्हणून चिंता, कोणाला ब्लड प्रेशर , बीपी, डायबेटिस, दमा, या सारख्या ससंख्य आजारांनी मानवी जीवनाला ग्रासून टाकले आहे. माणसाने कष्ट कमी करण्यासाठी अनेक सोप्या आणि आरामदायी गोष्टींचा शोध लावला मात्र हीच गोष्ट आता आपल्या रोग्यावर परिणाम करत आहे. पूर्वीच्या काळी लोकांचे जेवण हे आरोग्यादायी होते, योग्य प्रमाणात डाळी कडधान्य, आणि केमिकलचा नगण्य वापर यामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होत होती. सकस आहार आणि कष्टाने आजार होत नसत.

आटा चक्की असले प्रकार नसल्याने पीठ जात्यावर दळले जाई, चूल पेटवून त्यावर स्वयंपाक केला जाई, मातीच्या भांड्यांचा वापर होई, यामुळे शारीरिक बळकटी राहत असे त्या उलट आजच्या  आरामदायी जीवणाने कुठल्याही कष्टाला जागा न ठेवल्याने आपल्याकडे जीवन सुखकर बनवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. इतकेच नाही तर आपण या दुनियेत इतके हरवून गेलो आहोत की काही वेळमात्रसाठी या संसाधनांशिवाय राहणे अशक्य होऊन जाते. आज तुमच्यासाठी अशाच नाही निवडक गोष्टी सांगणार ज्या केल्याने सगळे आजार तर दूर पळतीलच. सोबत तुम्हाला एक आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्य जगायला मदत होईल .

एकाच प्रकारच्या व्यायामाचे असंख्य फायदे यात दिसून येतील. मग डॉक्टर आणि दवाखान्याला तुम्ही नक्कीच रामराम कराल. एक निरोगी आयुष्यसाठी या गोष्टींचा अभ्यास करा. दैनंदिन जीवनात फक्त काही वेळ या गोष्टींसाठी द्या सारख्याच प्रकारचे फायदे देणारे निवडक व्यायाम   आणि आरोग्यदायी  साधने पुढे दिलेली आहेत. व्यायाम प्रकारात कोणत्याही एका प्रकारचा नियमितपणे  अभ्यास केला तरी आजारांना दूर ठेवायला मदत होईल..

व्यायाम

1 – पोहणे (swimming) – स्विमिंग हा सर्वोत्तम व्यायाम आहे, रोजच्या नियमित सरावाने आजार दूर ठेवायला मदत होते. या प्रकारच्या व्यायामात शरीराच्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम व्हायला मदत होते. श्वसन संस्थे संबंधित आजार नाहीसे होतात. शारीरिक बळकटी येते. कोलेस्टेरॉल, रक्त प्रवाह सुरळीत राहणे, हाडांमध्ये बळकटी येणे, पोटा संबंधित विकार दूर होतात. पोहणे ही एक कला आहे यात संपुर्ण शरीराचा वापर होत असल्याने अनेक प्रकारच्या  व्याधी दूर होतात. पोहण्याच्या उत्तम सरावाने अशा अनेक प्रकारच्या आजारांना कायमचा रामराम करायचा असेल तर पोहणे हा व्यायाम नक्की करा.

2 – सायकल चालवणे  (cycle riding ) – सायकल चालवणे हा ही सर्वोत्तम व्ययामांपैकी एक व्यायाम आहे. वर सांगितलेले सर्व विकार नाहीसे व्हायला तितकीच मदत होते. सायकल चालवण्याने शारीरिक बळकटी आल्याने प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. स्नायू बळकटी आल्याने अनेक आजार दूर पाळतात, शारीरिक कस लागल्याने विशेषतः हृदयविकार दूर राहायला मदत होते. व्यवस्थित भूक लागून पचनसंस्था सुधारते, घामाचे विसर्जन झाल्याने रक्तातील अनावश्यक घटक ही बाहेर जातात, याने शरीराचा समतोल राखला जातो. मुख्यतः शारीरिक कस लागल्याने सर्व प्रकारच्या आजारांना लगाम लागायला मदत होते.

3 – पळणे  ( running ) – पळणे ही क्रियाच मुळात अत्यंत प्रभावी क्रिया आहे. म्हणून प्रत्येक खेळात बळकटीच्या दृष्टीने पळणे हा व्यायाम सर्वात आधी करणे योग्य मानले जाते. रनिंग केल्याने व्यक्ती चपळ बनते, परिणामी स्थूलता कमी होण्यास मदत मिळते, उत्तम आरोग्यासाठी हा व्यायाम नक्की करावा. खेळाडू आपल्या व्यायामात पळणे या प्रकाराला अधिक महत्व देताना दिसतात. पळल्याने श्वसनसंस्था सुधारून अनेक विकार दूर व्हायला मदत मिळते. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी शारीरिक बळकटी विकसित करणे आवश्यक असते. त्यासाठी हा व्यायाम प्रकार करून तुम्ही आपली प्रतिकारक्षमता वाढवू शकता.

4 – दोर उडया मारणे ( rop skipping) – रोप स्कीपिंग म्हणजेच दोर उड्या, हा ही व्यायाम पाळणे या व्यायामाशी निगडित आहे. वरील सर्व प्रकार एकसारख्या प्रकारचे फायदे देतात. नियमीत सरावाने स्नायू बळकटी मिळते, पोटाचे विकार दूर होतात. श्वसनसंस्था संबंधित विकार दूर होतात. दोर उद्या मारल्याने हुर्दयविकार दूर राहण्यास मदत होते. श्वसनस्वास्थ्य उत्तम राहिल्याने कोलेस्टेरॉल आणि मधुमेह नियंत्रित राहण्याचं मदत होते, शिवाय शरिरात  नवीन रक्तप्रवाह सुरू राहतो. रक्तभिसरण चांगल्या प्रकारे झाल्यास अनेक आजार दूर व्हायला मदत होते.

5 – ट्रेकिंग ( tracking) –  हा प्रकार ही सर्व प्रकरांन इतकाच प्रभावी आहे, या प्रकारच्या व्यायामात शरीराच्या सर्व अवयवांचा कस लागतो. याच मुले शरीरीक बळकटी वाढून प्रतीकारशक्ती  विकसित होते. शारीराची दमछाक झाल्याने घामाचे विसर्जन योग्य प्रकारे होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणेज निसर्गाचा आनंद घ्यालाला शिकतो. मोकळ्या हवेत आणि वातावरणात गेल्याने मन शांत होते, अस्थिर विचारांना पूर्णविराम लागतो आणि पॉसिटीव्ह विचार करायला सुरुवात होते. मन प्रसन्न झाल्याने आरोग्यावर ही याचे सकारात्मक परिणाम दिसतात. बळकटी वाढते व अन्य  प्रकारचे फायदे यातून मिळतात.

सहज वापरात आणता येतील अशा आरोग्यदायी गोष्टी..

1 –   स्वयंपाकात मातीच्या भांड्यांचा वापर –

सध्या बाजारात अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या मातीच्या वस्तू मिळतात, यातच मातीच्या भांड्यांना बाजारात मोठी मागणी आहे. पुन्हा सगळं जग तीनशे साठ अंशाच्या कोणात फिरताना दिसते. माहितीच्या भांड्यात जेवण बनवल्याने अनेक फायदेशरीराला मिळतात. मातीच्या भांड्यात बनवलेले जेवण सारखे गरम करावे लागत नाही, ते बराच काळ गरम राहते. मातीच्या भांड्यातून कॅल्शियम अन्नात उतरते,शिवाय चव ही उत्तम मिळते. आपण रोजच्या वापरात अल्युमिनियम आणि स्टील ची भांडी वापरतो त्याने शरीराला अपाय होऊ शकतो. स्टीलच्या भांड्यांसारखे वारंवार घासा असे करावे लागत नाही. तांब्या , वाटी, जेवणच ताट यांसारख्या अनेक गोष्टी बाजारात सहज उपलब्ध होतात, अर्थातच वापरायला आणि हाताळायला  थोडे  अवघड असले तरी यातून अनेक फायदे मिळतात. भांडे निवडण्यापासून तर वापरण्यापर्यंत अनेक प्रकारची माहिती नेट वर मिळते. अशाच काही निवडक गोष्टींचा वापर करून आपण आरोग्यादायी जीवन जगत असतो.

2 – शक्य असेल तर स्वयंपाकासाठी पारंपरिक पद्धतिचा वापर –

  • चूल-

पारंपरिक पद्धत म्हणजे मुखतः स्वयंपाक करण्यासाठी जुन्या काळात चुलीचा वापर केला जाई, त्यावर शिजवलेलं अन्न चवीला तितकेच पौष्टिक असे, सोबत मातीच्या भांड्यांचा वापर करून शिजवलेलं अन्न ही पौष्टिक आणि आरोग्यदायी असे. शहरी जीवनात हे शक्य होत नाही मात्र गावाकडे शक्य असताना ही गॅस शेगडी यांचा वापर वाढलेला दिसतो. महिला वर्गात याने सांदेदुखी, पाठदुखी यांचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. फ्रीजचा वापर करून बऱ्याच काळासाठी priserv करून ठेवलेल्या अन्नाच्या सेवनाने संदेदुखिला आमंत्रणं मिळते. शक्य तो  तयार केलेलं ताजे जेवण खावं, फ्रीज मध्ये जेवण ठेवणे आणि बऱ्याच काळाने ते खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

  •   पाटा- वरवंटा –

 वेळ असेल तर स्वयंपाकासाठी लागणारा मसाला हा पाट्यावर वाटा, याने दोन फायदे तुम्हाला मिळतील, एकत्र शारीरिक कष्ट पडल्याने स्नायू मध्ये बळकटी येईल आणि दुसरे , काही नैसर्गिक फायदे ही तुम्हाला चवदार जेवनातून मिळतील. दगडाच्या पाट्यावर वाटण वाटल्याने कॅल्शियम आणि लोह मिळतात जे मिक्सर मधे वाटल्याने मिळत नाही. वाटनासाठी पाट्याचा वापर केल्यास तुम्हाला संदेदुखी  आणि पाठदुखीचा त्रास होणार नाही. त्याने शरीराला उत्तम व्यायाम मिळतो. पाट्यावर वाटण वाटण्याचा पर्याय आताही उपलब्ध असला मात्र जात्यावर दळनं दळणे हा पारंपरिक पद्धत मात्र आता नाहीशी झाली आहे. पूर्वीच्या काळी जात्यावर दळण दळणे हे फार मोठे कष्टाचे काम होते. मित्र त्याने शारीरिक बळकटी मिळण्यास मदत होत असे. याने हाडांची बळकटी मिळण्यासाठी , उत्तम पचन होण्यासाठी, स्नायू बळकट होण्यासाठी मदत होत आसे. मात्र आता ती गोष्ट नसली तरी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो.

  • नाश्त्यामध्ये आरोग्यासाठी पूरक गोष्टी देणे.

पूर्वीच्या काळी ब्रेड , जॅम, बटर  हे असले प्रकार सहाजिकच नव्हते , पण जे प्रकार होते ते प्रोटीन्स ने परिपूर्ण असायचे. सकाळच्या न्याहरीच्या आधी मुलं भूक लागली म्हणून कलह करत त्या वेळी त्यांना, कडधाण्यांची उसळ करून दिली जाई, कधी चुलीवर मातीच्या भांड्यात गरम केलेलं खरपूस दूध आणि त्यात चुलीवर भाजलेली भाकर कुस्करून मिळत असे. मातीच्या भांडयात दूध उकळल्यावर  त्याला विशिष्ट प्रकारची चव येते, यातून कॅसेल्सिअम आणि भरपूर प्रमाणात कॅलरीज मिळत असत.

हा सर्वात पौष्टिक आहार. याच बरोबर  कढवलेले गायीचे  साजूक तूप असे. मुलांना खाण्यासाठी उडीदाचे लाडू ही बनवत असत त्याने मुलांचे  पोषण चांगले होत असे, गुळ-खोबरे आणि खजूर टाकून लाडू बनवले जात हेच त्या वेळचे होरलिक्स आणि ग्लुकोज. तुम्ही मुलाना खण्यासाठी , खजूर खोबरे घातलेले लाडू देऊ शकता, नाश्त्याला कडधान्य रात्रभर भिजवून त्याची छान उसळ बनवून देऊ शकता, ब्रेड जॅम देण्याऐवजी गूळ शेंगदाणे , आणि खोबरे देऊ शकता फळं देऊ शकता. या आशा लहान सहान कित्येक गोष्टींमधून आपण आरोग्यदायी जीवन जगू शकतो.

  • प्रवसाची साधने

प्रवासात आपण सर्रासपणे आपली खाजगी वाहने काढतो, अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर जायचे असले तरीही आपण गाडीचा वापर करतो, याच गोष्टी टाळून कमी अंतरासाठी वाहनांचा वापर न करता, पायी जाणे किव्वा सायकल चा वापर केल्यास उत्तम. याने पैसे बचत आणि आरोग्या दोन्ही ही मिळेल. शक्य असल्यास वेळेच्या आधी निघा, फोन मध्ये wolking डिस्टन्स आणि स्टेप काउंटर ठेवा याने तुमच्यासमोर एक टार्गेट राहील, रोज आपल्याला किती चालायचे हे ठरवून तुम्ही चालायला सुरुवात कराल, तुमच्या आरोग्याला याचा फायदा होईल.

असे कित्येक प्रकारचे उपाय करून आरोग्यालाहानी पोहचण्यापासून आपण रोखू शकतो. सध्याचे बैठे जीवन आणि आरोग्यासाठी घातक गोष्टींचे सेवन यामुळे  आजार वाढून आपण त्यांना बळी पडत आहोत. अम्ली पदार्थांचे सेवन करणे , धूम्रपान किव्वा आणखी नशेच्या पदार्थांचे मॉडर्न युगाच्या नावाखाली सारर्स सेवन चालते. धाकधुकीच्या आणि धावपळीच्या जीवनात माणूस जगणेच विसरून गेला आहे त्यात होणारे हे केमिकल युक्त जेवण. मात्र तरीही य सर्वांत आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं तितकेच गरजेचं आहे. तरीही आपण आपल्या परीने नियमित व्यायाम आणि सराव केल्याने  उत्तम आरोग्य लाभू शकते , त्यामुळे नक्कीच या घटकांचा अभ्यास करून आपल्या दैनंदिन जीवनात याचा वापर करून घ्या.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *