हेल्थ

रोज किचनमध्ये काम करताना तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या काही गोष्टी

स्वयंपाक घरात काम करत असताना काही अशा अनेक गोष्टी असतात त्या आपल्याला माहीत नसतात. म्हणून आज आपण काही थोड्या टिप्स जाणून घेणार आहोत. महिला गॅसवर दूध तापत ठेवतात पण नेहमीच त्यांचे दूध उतू जाते अशा वेळी आपण दुधा खालचे गॅस मंद ठेवावे शिवाय पातेले ही थोडे मोठे असावे

खोबरे खराब होऊ नये म्हणून ते फ्रिझर मध्ये ठेवावे याशिवाय तुरीच्या डाळीत किंवा किसून भाजून ठेवावे.
भाजी शिवताना नेहमी मंद आचेवर शिजवावी त्यामुळे त्यातील जास्तीत जास्त पोषक्ततव आपल्या शरीराला मिळतात. वरण भात करण्याअगोदर डाळ आणि तांदूळ पाण्यात भिजत ठेवावे त्यांनतर शिजवावे लवकर शिजते.

पनीर काढल्यावर राहिलेले पाणी फेकू नये चपातीचे पीठ मलायला त्याचा उपयोग करावा चविष्ट तर होतात शिवाय पोषकत्त्व मिळतात. कोणत्याही प्रकारचे भजी बनवायचे असल्यास ते कुरकुरीत होण्यासाठी त्यात थोड तांदळाचं पीठ मिसळा. गोड पदार्थ चविष्ट लागण्यासाठी त्यात चिमुट भर मीठ टाका.

पुऱ्या तळताना त्या जास्त तेलकट होऊ नये म्हणून 10 मिनिट ते पीठ फ्रीज मध्ये ठेवा. लिंबू जास्त काळ टिकण्यासाठी ते चांगले धुवा पुसा नंतर खोबरेल तेल लाऊन फ्रीजमध्ये ठेवा. इडली मऊ लुसलुशीत करण्यासाठी जेव्हा डाळ तांदूळ वाटता तेव्हा त्यात थोडा शिजलेला भाज ही वाटावा.

अंडी उकळताना कधी कधी फाटतात आणि सर्व मिश्रण बाहेर येते. त्या पाण्यात थोडे व्हिनेगर मिसळावे. कांदा कापताना डोळ्यात पाणी येते अशा वेळी त्याच्या दोन फोडी करून त्या पाण्यात ठेवाव्या. पालेभाज्या शिजवताना लोखंडी कढईत शिजवा त्यामुळे लोह आपल्याला मिळते. वर दिलेल्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी घरात केल्या आहेत किंवा यापुढे कराल ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *