बातमी

अजब देशांच्या गजब गोष्टी ऐकून थक्क व्हाल

strange things of strange countries

भारतातील काही प्रथा, नियम, कायदे हे चुकीचे आहेत असे अनेक वेळा बोलले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? की भारतापेक्षा वेगळे असणारे जगातील असे काही देश आहेत, ज्यांचे सामान्य आयुष्यातील नियम पाहून तुम्ही हैराण व्हाल. तुम्हाला माहिती आहे का? जर्मनीमध्ये कोणालाही त्यांच्या वाढदिवसाच्यापुर्वीच विश करणे अपशकुन मानला जातो. आज आम्ही तुम्हाला जगभरातील अशाच काही विचित्र गोष्टींविषयी सांगणार आहोत.

  • जर्मनी

जर्मनी म्हटले की आपल्या नजरेसमोर एकापेक्षा एक सरस कार्स उभ्या राहतात. इंजिनिअरिंगमध्येही जर्मनीने अभूतपूर्व क्रांती केलेली आहे. तसेच जर्मनी म्हटले की जगाला युध्दाच्या खाईत लोटणारा हिटलर आठवतो, तशीच आठवते बर्लीनला विभागणारी व आता जमीनदोस्त झालेली भिंत. मात्र जर्मनी म्हणजे इतकेच नाही तर जर्मन लोक शौर्य आणि इमानदारपणाबद्दलही ओळखले जातात. या जर्मनीची आणखी वेगळी ओळख येथे करून देत आहोत.

बर्थडे विश आणि अपशकुन

जर्मनीमध्ये कुणालाही त्यांच्या वाढदिवसाच्या पुर्वीच विश करणे किंवा केक गिफ्ट करणे अपशकुन मानला जातो. जर्मनी हा युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. अर्थात ही लोकसंख्या अ्राहे ८ कोटी. आता ही लोकसंख्या आपल्या भारताच्या आंध्रप्रदेशाइतकीच आहे ही बाब वेगळी.  असे असले तरी जर्मनीची राजधानी बर्लिन हे शहर फ्रान्सच्या राजधानी पॅरिस पेक्षा ९ पट मोठे आहे.

जर्मनीत तुरूंगातून कैदी पळाला तर त्याला शिक्षा होत नाही. कारण प्रत्येक माणसाला स्वतंत्र व्हायचेच असते असा विचार येथे केला जातो. या उलट कुणी नाझी सॅल्यूट मारला तर तो मात्र अपराध समजला जातो. जर्मनीत बाळाचे नांव ठेवताना नावावरून मुलगा अथवा मुलगी हे कळले पाहिजे असेच ठेवावे लागते. नावावरून लिंगबोध होणार नाही असे नांव येथे ठेवता येत नाही. उहारणार्थ बॉबी. येथील १ टक्के नागरिक अनुवंशिक रित्या एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. जर्मनी लढवय्यांचा देश असला तरी या देशाचे संरक्षण बजेट जेवढे आहे, तेवढा खर्च अमेरिकेत पाळीव मांजरांसाठी केला जातो.

  • केनिया

कुणालाही त्याच्या पहिल्या नावाने हाक मारु नका. जर एखाद्याला कुणाला तरी त्याच्या नावाने हाक मारायची असेल, तर त्याला स्वतःचे नाव त्याच्या नावासोबत जोडावे लागते.  एकदा माकडामुळे केनिया देशाला तब्बल 4 तास वीज संकटाचा सामना करावा लागला. देशातील सर्वात मोठ्या ट्रान्सफार्मरवर माकड पडल्यामुळे हा प्रकार घडला.

 केनिया हा आफ्रिका खंडातला देश आहे. नैरोबी ही केनियाची राजधानी. केनियामध्ये 60 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. इथले लोक एकापेक्षा जास्त आफ्रिकन भाषा बोलतात. केनियामध्ये शालेय शिक्षण मोफत दिलं जातं. इथली बरीच मुलं घरातल्या तसंच शेतीच्या कामांमध्ये मदत करत असल्याने शाळेत जात नाहीत. संगीत, गोष्टी सांगणं इथल्या संस्कृतीत महत्त्वाचं मानलं जातं. इथे राहणार्‍या विविध समाजांनी गाणी, गोष्टी आणि कवितांमधून संस्कृती पुढे नेली.

हा देश हिंदी महासागर आणि व्हिक्टोरिया तलावाच्या मध्ये असल्यामुळे व्यापारउद्योगासाठी सतत माणसांची ये-जा असायची. जगभरातून तसंच मध्य-पूर्वेतून लोक येत असत. यामुळे केनियामध्ये सांस्कृतिक वैविध्य पाहायला मिळतं. विविध जातीधर्माचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक इथे राहतात. माणसाचा उगम सर्वात आधीउत्तर केनिया आणि टांझानियामध्ये झाल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे. इसवी सन 1600 आणि 1700 या काळात अरब, अमेरिकन आणि युरोपियन लोक केनियातल्या लोकांना गुलाम बनवून आपल्या देशात नेत असत.

केनियामध्ये भरपूर निसर्गसौंदर्य आहे. जंगलं आणि प्राणी पाहण्यासाठी लोक इथे भेट देतात. हत्ती, सिंह, चित्ता, झेब्रा, जिराफ, गेंडा यासारखे प्राणी केनियातल्या जंगलांमध्ये पाहायला मिळतात. प्राण्यांच्या संरक्षणासाठी केनियामध्ये 50 पेक्षा जास्त अभयारण्यं आणि राष्ट्रीय उद्यानं आहेत. आफ्रिकेतलं वन्यजीवन पाहण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक केनियाला येतात. जगात कुठेही न आढळणारे प्राणी इथे पाहायला मिळतात. 1920 ते 1963 या काळात केनियावर ब्रिटिशांचं राज्य होतं. स्वातंत्र्यानंतर आता तिथे लोकशाही आहे. केनियन शिलिंग हे इथलं चलन आहे. स्वाहिली आणि इंग्रजी या इथल्या प्रमुख भाषा आहेत.

  • सिंगापुर

पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये काहीही खाणे कायद्याच्या विरुध्द आहे. सिंगापूर हे आजचे इंग्रजी नाव मूळ मलय सिंगपूरा वरून आले. यातला सिंग हा संस्कृत सिंह आणि पुरा हे संस्कृत पुरमचे स्थानिक रुप असल्याचे मानले जाते. म्हणजेच सिंहपुरम या मूळ नावाचे रूप बदलत जाऊन ते सिंगापूर झाले आहे. जगभरातून लाखो लोक दरवर्षी सिंगापूरला पर्यटन च्या निमित्ताने भेट देतात परंतु बुद्धांचा दात असलेले भव्य बुद्ध मंदिर मात्र अपवादानेच असलेले याठिकाणी पाहिले जाते.

बहुसंख्य भारतीय पर्यटकांना असे एक मंदिर येथे आहे. याची फारशी माहिती नाही. सिंगापूरच्या चायनाटाउन परिसरात बुद्धा भूत रेलिक हे अति भव्य मंदिर आहे मंदिर पाच मजली असून पूर्णपणे लाकडी आहे. हे मंदिर म्हणजे चिनी स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना मानला जातो. मंदिर उभारण्यासाठी लाकडी इंटरलॉकिंग बॉक्सचे तंत्रज्ञान वापरले असून हे तंत्रज्ञान म्हणजे चीनने जगाला दिलेली देणगी समजली जाते. आपल्याकडील मंदिरात जसे रक्षक किंवा द्वारपाल असतात तसेच दोन द्वारपाल याही मंदिराच्या प्रवेशद्वाराशी आहेत या दोन्ही द्वारपाल यांचे चेहरे उग्र असून कोणत्याही शक्तीशी लढाई करण्यास तयार असल्यासारखे वाटतात. प्रवेशद्वारात श्रीलंके होऊन आणलेले नागपुष्पाची चार झाडे आहेत नागपुष्पाच्या झाडाखालीच बुद्ध मैत्रीय यांना ज्ञान प्राप्त होणारा अशी अख्यायिका आहे त्यामुळे या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.

  • चीन

चीनमध्ये एखाद्याला गिफ्ट म्हणून घड्याळ किंवा छत्री देणे अपशकुन मानला जातो. चीनची भिंत म्हणजे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य! अर्थात आपल्याला चीनची ही भिंत जगातील एक आश्चर्य म्हणूनच माहित आहे. पण याव्यतिरिक्त काही आश्चर्य या भिंतीशी जोडलेली आहेत. या भिंतीमागचा इतिहास जेवढा रंजक आहे तेवढ्याच काही रंजक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आम्हाला माहिती नाहीत. चीनची ही विशाल भिंत ७ व्या शतकामध्ये म्हणजेच २८०० वर्षापूर्वी बनवण्यास सुरुवात झाली होती आणि या भिंतीला पूर्ण करण्यासाठी जवळपास २००० वर्ष लागली होती.

या प्रसिद्ध भिंतीच्या निर्मितीची सुरुवात राजा किन शिहुआंगने केली होती. एकेकाळी या भिंतीला अनेक नावे देण्यात आली होती. जसे की, रमपंत, पर्पल फ्रॉट्रीयर, अर्थ ड्रॅगन वगैरे वगैरे! मात्र १९ व्या शतकामध्ये या भिंतीला द ग्रेट वॉल ऑफ चायना हे नाव देण्यात आले, जे अखेर अजरामर झाले. या भिंतीचे काही भाग एकमेकांशी जोडलेले नाहीत. जर या भिंतीचे सर्व भाग एकमेकांना जोडले तर या भिंतीची एकूण लांबी ८८४८ किलोमीटर एवढी असेल. चीनची भिंत एवढी रुंद आहे की त्यावर एकाचवेळी ५ घोडे आणि १० लोक पायी जाऊ शकतात.

जेव्हा भिंतीची निर्मिती करण्यात येत होती, तेव्हा कोणाच्याही हातून चूक झाली तर त्या व्यक्तिला/कामगाराला त्याच भिंतीच्या खाली गाडले जात असे. म्हणून या भिंतीला जगातील सर्वात मोठे कब्रस्तान देखील म्हटले जाते. चीनची भिंत ही एकच अशी मानवनिर्मित वास्तू आहे, जी अवकाशातून देखील स्पष्टपणे पाहता येते. एकदा  पाहण्यासाठी जरून भेट द्यावी अशी गोष्ट

  • आयरलँड

आयर्लंड हा एक असा देश आहे ज्या विषयी तुम्हाला जास्त माहिती नसेल. येथील स्थानिक भाषा आयरिश असून या देशातील लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे. क्रिकेट वरून तुम्हाला आयर्लंड आठवले असेल. तर यात आयर्लंड विषयी आम्ही तुम्हाला अशा काही दहा गोष्टी सांगणार आहोत त्या ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

1. 2011 मध्ये आयर्लंड ची लोकसंख्या 6.4 मिलियन इतकी होती. युरोपातील सगळ्या देशांच्या तुलनेमध्ये ब्रिटन नंतर येणारी दोन नंबरची सगळ्यात जास्त लोकसंख्या आयर्लंडची आहे.

2. आयर्लंडमध्ये 12800 इसवीसन पूर्व या काळात सुद्धा मानव जात असल्याचे पुरावे सापडले आहेत.

3. सन 900 मध्ये आयर्लंडमध्ये Sean’s bar खोलण्यात आले होते आणि ते अजूनही चालू आहे.

4. आयर्लंडच्या उत्तर दिशेला असणाऱ्या एका शहरामध्ये टायटॅनिक जहाज बनवले गेले होते.

5. आयर्लंडमध्ये साप आढळून येत नाही याचे मुख्य कारण म्हणजे तेथील थंड प्रदेश हे आहे.

6. आयर्लंडमध्ये सन 1845 ते 1852 च्या दरम्यान एक मोठा दुष्काळ पडला होता ज्यातून हा देश अजून हि वर आलेला नाहीये. त्यावेळी या देशाची लोकसंख्या ऐंशी लाख इतकी होती तर आत्ता 64 लाख इतकीच राहिली आहे.

7 या देशांमध्ये दहा टक्क्यांपेक्षा सुद्धा कमी लोक आयरिश भाषा बोलतात.

8. आयर्लंड मध्ये आजच्या घडीला जिवंत असणाऱ्या अस्वलांचे पूर्वज शोधण्यास गेल्यास हे कळते की पन्नास हजार वर्षांपूर्वी आयर्लंड मधील एका मादीचे ही सर्व पिल्ले आहेत

  • अदर वर्ल्ड किंगडम

या नावाचा हा देश १९९६ मध्ये युरोपियन देश चेक रिपब्लिकपासून तयार झाला. वुमन ओव्हर मेन असा मोटो असलेल्या या देशाचं शासनही महिलांच्याच हाती आहे. या देशाची राणी पॅट्रिसिया – १ ही आहे. इथे या राणीचाच दबदबा आहे. इतर देशांनी या देशाला देशाचा दर्जा दिलेला नाही. या देशाची राजधानी ब्लॅक सिटी आहे. या देशातील पुरूष गुलामांपेक्षा वेगळे काही नाही. चेक रिपब्लिकमध्ये असलेल्या या देशाचा ध्वज, करन्सी, पासपोर्ट आणि पोलीस फोर्स आहे. येथील मूळ निवासी नागरिक केवळ महिला आहेत. या देशाची सर्वात खास बाब म्हणजे येथील राणी पॅट्रिसिया – १ चा चेहरा आजपर्यंत बाहेरील जगाने पाहिला नाहीये.

या देशात पुरूषांना जनावरासारखं समजलं जातं. या देशाच्या निर्माणासाठी १२ कोटी रूपये खर्च आला होता. इथे दुसऱ्या देशातून येणाऱ्या पुरूषांना राणीसाठी सोफा किंवा खुर्ची तयार करावी लागते. त्यावरच ती बसते. इथे जर गुलामांना दारू पिण्याची इच्छा झाली तर दारू मालकाच्या पायांवर टाकली जाते, त्यानंतर गुलाम पितात.

राणी पॅट्रिसिया – १ हिलाच देशातील कायद्यात परिवर्तन करण्याचा अधिकार आहे. त्यांनी या देशाची नागरिकता हवी असलेल्या महिलांसाठी काही नियम तयार केले आहेत. कुणीही आपल्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याच्या वयात पोहचलं असेल तर त्यांना संबंध ठेवण्याचा अधिकार आहे. महिलेकडे कमीत कमी एक पुरूष गुलाम असावा. ती महिला या देशातील सर्व नियम पाळणारी असावी. महिलेला कमीत कमी पाच दिवस राणीच्या महालात रहावं लागेल.

तीन हेक्टर म्हणजे ७.४ एकर जमिनीवर असलेल्या देशात अनेक इमारती आहेत. २५० मीटरचा एक तलाव आणि गवताचे मैदान आहेत. येथील मुख्य इमारत राणीचा महाल आहे. इथूनच देशाचं शासन चालतं. त्यासोबतच इथे स्विमिंग पूल, नाइट क्लब्सही आहेत.

  •  टर्की

कुणासमोरही आपण OK आहे असे दाखवू नका. येथे याला चुकीचे मानले जाते. खूप प्राचीन काळी मानव गुहेत रहात होता असे आपण शिकत आलो आहोत. पुढे आपले जीवनमान बदलत गेले. आपण चांगली घरे बांधून राहू लागलो. मात्र, टर्की या देशातील कॅपाडोशिया या प्रदेशात डेरिंक्यू नावाचे एक अद्यावत संपूर्ण शहरच जमिनीखाली वसवले होते.

60 मीटर खोल आहे शहर

> या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे विविध मजले असलेली ही एक नियोजनबद्ध वसाहत आहे.

> जमिनीखाली 60 मीटर खोलीवर हे शहर आहे.

>सर्वप्रकारच्या अन्न खाद्य पदार्थाच्या अन्य जीवनाश्यक सोयी येथे केलेल्या होत्या.

> दगडी शिळांच्या दरवाज्याने हे शहर बंद केले जाई. > या शहरात 20 हजार माणसे आरामात राहू शकत होती.

  • नॉर्वे

नॉर्वे हा एकमेव असा देश आहे जिथे मध्यरात्री सूर्य चमकतो.. सोळा ते अठरा वयानंतर इथली तरुणाई वेगळं राहणं पसंत करते. उदरनिर्वाहासाठी पार्टटाइम जॉब करते. काम करणं आणि पैसा कमावणं यात त्यांना कमीपणा वाटत नाही. मुलगा किंवा मुलगी कोणीही असलं तरी प्रत्येक गोष्टीत समानता आदर आणि संधी योग्य प्रमाणात मिळते. केवळ ऑफिसच्या कामातच नव्हे तर घरकामातही हेच चित्र दिसतं.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *