सुमित हा उत्तम अभिनेता असला तरी तो मुळात शेतकरी आहे. गावाला त्याचे बाबा आणि आजी आजही शेती करतात. त्याचे शिक्षण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन पुणे मधे केले आहे. त्यानंतर त्यांनी एकूण तीन हॉटेलमध्ये जॉब ही केला आहे. त्याचा जन्म 7 डिसेंबरला सांगलीमध्ये झाला. सांगलीच्या दिघांजी गावात जन्माला आलेल्या सुमित यांचे संपूर्ण शिक्षण हे सुध्दा सांगली जिल्ह्यात झाले आहे.
हॉटेलमध्ये काम करता असताना त्यांनी हॉटेल मधील एका रॅम्प वॉकमध्ये भाग घेतला होता. तेव्हा तिथल्या फोटोग्राफरने त्यांना विचारले की तुम्ही मोडलींग कराल का त्यांनी होकार दिला. आणि मॉडेलिंगला सुरुवात केली. त्याचबरोबर मॉडेलिंग करत असताना त्यांना सरगम या चित्रपट काम करण्याची संधी मिळाली या चित्रपट मध्ये ते नकारात्मक भूमिकेत दिसले होते.

पत्रे सरकार या नाटकात नागनाथ अण्णा ही भूमिका एक क्रांतिकारक म्हणून उत्तम पणे साकारली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई गाठली तिथे प्रियांका चोपडा प्रॉडक्शनसाठी मुख्य सहाय्यक दिग्दर्शन म्हणून चार चित्रपट केले. त्याचबरोबर झी मराठीवरील “लागिर झालं जी” या मालिकेत ही ते आपल्याला दिसले आहेत. यात ही ते नकारात्मक भूमिकेत होते. त्यानंतर ते “स्वराज्य रक्षक संभाजी” या मालिकेमध्ये ते हर्जी राजे महाडिक म्हणून झळकले.
सध्या सुमित हे बळूमामाच्या नावानं चांग भल” या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. त्याचा अभिनय त्याच्यातील भक्तिमय स्वभाव याच्यावर प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. ह्या भूमिकेचे त्यांनी सोने केले. तुम्हाला ही आवडते का सुमितची भूमिका तर तुम्ही अभिक्रिया नक्की कळवा.