“सुंदरा मनामध्ये भरली” ही मालिका जेव्हा टीव्ही वर आली तेव्हा ती प्रेक्षकांना खूप आवडली होती. पण सध्या तरी ही मालिका प्रेक्षकांच्या मनातून उतरत चालली आहे. तिचा टी आर पी ही घसरला आहे. त्यामुळे ही मालिका बंद पडणार आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय त्यात मालिकेतील चार कलाकारांनी सलग मालिका सोडली त्यामुळे ही मालिका बंद पडेल याची शक्यता जास्त आहे.
या मालिकेतील अभ्या म्हणजे समीर परांजपे आणि लतिका म्हणजे अक्षया नाईक या दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. म्हणजे एक वेगळे प्रेम दाखवले होते लतिका जाडजूड आणि अभ्या फिटनेसच्या बाबतीत अग्रेसर. तरीही त्यांचे लग्न होऊन तुटका मुटका संसार आणि वेळ घटस्फोट पर्यंत ही येऊन ठेपली होती.
मालिकेचा टी आर पी एकदा का घसरला की, ती मालिका बंद करण्यात आली म्हणून समजा. काही मालिका ह्या अशाच बंद पडल्या आहेत. हा जुना इतिहास आहे. पहिले तर अभ्याची वहिनी हेमा हिने ही मालिका सोडली आहे तिच्या चेहऱ्यावर मेकअप ने अलर्जी आल्याने तिने ही मालिका सोडली.
याशिवाय लतिका हीची मोठी बहीण दाखवलेली गौरी किरण हिने मालिका सोडली ती आता “तुझ्या रुपाच चांदणं या मालिकेत दिसत आहे. त्यानंतर दौलतच्या वडिलांची भूमिका करणारे धनंजय वाबळे यांनीही गी मालिका सोडली. आणि या मालिकेतील कमिनीची भूमिका पूजा पुरंदरे म्हणजे मिस नाशिक अशी तिची ओळख होती तिनेही ही मालिका सोडली आहे.
सुंदरा मनामध्ये भरली मधील नकारात्मक भूमिका करणारी हेमा हिने या कारणाने सोडली मालिका
इतके जन या मालिकेतून हळू हळू निघून गेल्यामुळे कदाचित प्रेक्षकांचे मनच उडाले ही मालिका बघण्यासाठी, तरीही बघुया ही मालिका अजून किती वेळ तग धरते.