सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका मागच्या भागात प्रेक्षकांचं हिरमोड करत होती. कारण अभ्या आणि लती दोघंही वेगळं राहत आहेत, शिवाय त्यांच्यात दुरावा आहे. पण सध्या या मालिकेत एक नवीन एन्ट्री होत आहे. त्यामुळे या मालिकेला एक वेगळं वळण मिळत आहे आणि यामुळे प्रेक्षक अधिक उस्तुक आहेत की या मालिकेत पुढे काय पाहायला मिळेल. तर बघुया नक्की ही नवीन येणारी अभिनेत्री आहे तरी कोण.
ही नंदिनी म्हणजे अदिती द्रविड होय. ती आपल्याला याअगोदर “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेत पाहायला मिळाली होती. तसेच “या गोजिरवाण्या घरात” नाटकाचं तिला सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय ती “बाळासाहेब आंबेडकर” या मालिकेत तुळसाच्या भूमिकेत दिसली होती.

या अभिनेत्रीच नाव आहे नंदिनी . ही नदिनी कदाचित अभी आणि लती या दोघांमध्ये येत आहे. कारण यापुढे ही नंदिनी अभीच्या बाजूने उभी राहणार आहे की दौलतच्या बाजूने हे पाहण्यात खरी मजा आहे. त्यामुळे सध्या तरी मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोचली आहे हे पाहायला मिळेल.
लती आणि अभी यांच्या नात्याला तर बापूंचा विरोध आहेच शिवाय त्यांच्या मैत्रीला ही आहे. त्यामुळे अभ्याने हे नाते टिकविण्याचा आणि लतीच्या मनात प्रेम रुजविण्याचा प्रयत्न केला तरी बापू त्याचा हिरमोड करतात. तर बघुया आता आलेली अभिनेत्री अभीच्या आयुष्यात कोणते रंग भरणार आहे.
अभिने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात लग्न मंडपात लती त्याला गुलाब देते आणि हाच गुलाब तो नंदिनीला देतो. त्यामुळे हे ट्रायेंगल पाहायला अधिक जास्त रंजक येणार आहे ह्यात काही शंका माझी. पती पत्नी और वो हा फॉर्म्युला कोणत्याच मालिकेसाठी नवीन नाही.
ती लती आणि अभीच्या मधे येऊन एक वेगळे नाते निर्माण करते की अभी आणि लतीचे नाते तोडण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला काय वाटते ते कॉमेंट करून सांगा.
1 Comment