माझा होशील ना ह्या झी मराठी वाहिनीवरील मालिकेने अनेकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रत्येक पात्राने आपली एक वेगळी छाप रसिकांच्या हृदयावर कोरली आहे. ह्यातलेच एक पात्र म्हणजे बंधू मामा. बंधू मामा म्हणजेच तुमचे आमचे लाडके अभिनेते सुनील तावडे.
सुनील तावडे गेले अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टीत आपल्या वेगवेगळ्या शैलीच्या अभिनयातून प्रेक्षकांचे मन जिंकत आले आहेत. आजवर त्यांनी जबरदस्त (२००७), शोध (२००३), मेमरी कार्ड (२००८), मलाल (२०१९), रेडिमिक्स (२०१९) आणि काळे धंदे वेब सिरीज मध्ये त्यांनी काम केलं आहे. याचबरोबर अनेक मराठी मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केली आहेत.
आपल्या अभिनयाने ते नेहमीच एक वेगळा उच्चांक गाठतात. मग तो सीन कॉमेडी असो किंवा दुःखाचा, त्यांचा प्रत्येक सीन बघताना मन भारावून जात. पण तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची कल्पना असेल पण एक गोष्ट अशी आहे की खूप कमी लोकांना माहीत आहे. ती म्हणजे त्यांचा मुलगा शुभंकर तावडे. शुभंकरने मराठी सिनेमात आणि मालिकांमध्ये सुद्धा कामे केली आहेत.

डबल सीट ह्या सिनेमातून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनतर झी युवा मालिकेवर सर्वात आधी आलेली फ्रेशर ह्या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. रिंकू राजगुरू सोबत कागर ह्या सिनेमात सुद्धा तो मुख्य भूमिकेत दिसला होता. त्याचबरोबर झी फाईव वर आलेली काळे धंदे वेब सिरीज मध्ये त्याने आपल्या अभिनयाने अक्षरशः चारचांद लावले आहेत. तुम्ही अजून हि वेब सिरीज पाहिली नसेल तर नक्की पहा.
ह्याच वेब सिरीज मध्ये सुनील तावडे सुद्धा आहेत. दोघेही सोबत स्क्रीन शेअर करताना तुम्हाला दिसतील. तर मंडळी शुभंकर हा सुनील तावडे ह्यांचा मुलगा होता हे कुणा कुणाला माहीत होतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.