बातमी

Covishield चे दोन डोस झाल्यानंतर तिसरा पण घ्या : सायरस पुनावाला

१२ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण भारतभर ५२ करोड लोकांना लस देण्यात आली आहे. तरीही लोकांच्या मनात अजून संभ्रम आहेच की कोणती लस चांगली कोणती वाईट? काही लोक कोविशिल्ड तर काही को वेकक्सिन ला प्राध्यान्य देतात कारण ह्या स्वदेशी लस आहेत.

सध्या कोविशिल्ड लसी बाबत लोकांच्या मनात खूप सारे गैरसमज आहेत. बहुतेक जण ही लस घेत आहेत तर काही दुर्लक्ष करत आहेत. ही लस घेतल्यानंतर हळू हळू त्याची कॅपिसिटी कमी होत जाते. अशा बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत. मग नंतर काय करायचे हा प्रश्न सर्वांपुढे आहे.

सायरस पूनावला यांची कोविशिल्ड लसिबाबत असणारी भूमिका त्यांच्या तोंडून ऐका. ते काय म्हणाले या लसीबाबत. जेणेकरून तुम्ही ही लस घेतली असेल किंवा घेणार असाल तर याबाबत काही गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात. की ज्यामुळे तुम्ही या व्हायरस पासून वंचित राहू शकाल. त्यांचं म्हणणं आहे की ज्यांनी ज्यांनी ही कोविशिल्डची लस घेतली आहे त्यांनी सहा महिन्यानंतर पुन्हा तिसरी लस घेणे आवश्यक आहे.

सायरस पूनावला यांनी स्वतः हा तिसरा डोसे घेतला आहे. याशिवाय त्यांच्या सिरममध्ये काम करणाऱ्या सात ते आठ हजार कामगारांना ही तिसरा डोस दिला आहे. म्हणून पूनावला यांनी जनतेला विनंती केली आहे की तुम्ही जर दुसरी लस घेतली आहे तर सहा महिन्यांनी तिसरी लस नक्कीच घ्या.

त्यांचे मत आहे की त्याचा प्रादुर्भाव जरी सहा महिन्यांनी कमी होत असला तरी पुन्हा नवीन डोसे घेतलाच पाहिजे. कारण हा रोग नवीन आहे त्याच्यावर आपण आपल्याकडून कमी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या विधानावर तुमचं मत काय आहे आम्हाला नक्की सांगा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *