बॉलिवूड मध्ये सगळ्या लग्नाचे वारे मोठ्याने वाहत आहेत. अनेकांच्या लग्नाच्या बातम्या समोर येताना दिसत आहेत. काजोलची बहीण म्हणजे तनिषा ती सुद्धा एक अभिनेत्री आहे हे तुम्हाला माहीतच आहे. तिने ही बॉलिवूड मध्ये काम केले आहे. तिने अनेक चित्रपटातून काम केलं आहे. नील एंड निक्की, सरकार राज, वन टू थ्री, टैंगो चार्ली चित्रपटात ती आपल्याला दिसली आहे याशिवाय बॉलिवूड मध्ये तिचा पहिला चित्रपट ‘शूssss’ हा होता.
तनिषा ही काजोलची बहीण आणि अजय देवगण यांची मेव्हणी पण त्या दोघांसाठी छाप ती प्रेक्षकांवर पाडू शकली नाही तिचे चित्रपट ही बघायला गेलात तर फ्लॉपच झाले. याशिवाय आतातरी तिच्याकडे असा कोणताच चित्रपट नाही. ती याअगोदर बिग बॉसची स्पर्धक म्हणून ही आलेली पण तरीही अजून तिच्याकडे कोणताच प्रोजेक्ट नाही आहे.

या सगळ्या गोष्टी आता मागे राहिल्या आता चर्चा आहे ती फक्त लग्नाची त्यामुळे प्रत्येकाच्या मनात लग्नाबद्दल कुतूहल असणारच. त्यातच तनिषा ही सोशल मीडियावर ॲक्टिव असते आणि तीने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात तिने पायात जोडाव्या घातल्या आहेत ह्या जोडाव्या फक्त लग्न झालेल्या स्त्रिया घालतात त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला त्यांनी यावर कॉमेंट ही केल्या पण त्यांच्या या कॉमेंटच उत्तर मिळालं नाही.
तनिषा ने लग्न केले आहे की नाही यावर अजूनही पडदा आहे. कदाचित आजकालची फॅशन म्हणून ही तिने घातले असतील पण तरीही आपल्या समाजात लग्न झालेली स्त्रीचं अशा प्रकारच्या जोडाव्या घालते. त्यामुळे सत्य काय आहे ते तिच्या कडूनच कळेल.