हेल्थ

पनीर खाल्यानंतर हे नुकसान सुद्धा होतात

पनीर पाहायला गेलात तर जास्त करून आपल्या शरीरासाठी चांगलेच आहे. त्यामुळे ते आपल्या पोटात जायला हवे. त्यासाठी तुम्ही पनीरचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता. मटार पनीर, पनीर मसाला, पालक पनीर, पनीर पराठा सँडविच, भजी असे पदार्थ बनवू शकता.

ज्या लोकांच्या शरीरात युरीक असिड जास्त वाढलेले असते त्यांना पनीर खाणे धोक्याचे आहे. याशिवाय जे लोक जिम करतात त्यांच्यासाठी पनीर हा उत्तम स्रोत मनाला जातो. दुधात ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा स्त्रोत असतो हाच स्त्रोत पनीर मध्येही असतो त्यामुळे तुम्हाला त्वरित ऊर्जा हवी असेल तर तुम्ही पनीर खा.

पनीर मध्ये कॅल्शिअम आणि फॉस्प्रारस मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे तुमची हाडे शिवाय दात ही चांगले मजबूत राहतात. पनीर खाल्याने आपल्याला भरपूर प्रथिने मिळतात जी आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत. जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी प्रथिनांचा हा एक उत्तम स्रोत आहे.

शरीरातील पचन तंत्र व्यवस्थित चालण्यासाठी मेटा बोलिझम आवश्यक असते आणि ते आपल्याला पनीर मधून मिळते. पनीर कॅन्सर सारख्या रोगावर ही खूप फायदेशीर आहे. यामधे ओमेगा ३ असल्यामुळे डॉक्टर ही मधुमेही पेशंट ला पनीर खाण्याचा सल्ला देतात. पनीर हा दोन्ही तऱ्हेच्या मधुमेहींसाठी अत्यंत उपयोगी आहे पनीर मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

नियमित पनीर खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच पोटाची पचनसंस्था ही चांगल्या पद्धतीने काम करते. पनीर खाण्याचे जसे फायदे आहेत तसे नुकणान ही आहेत. जास्त पनीर खाल्ल्याने त्याच्यात असणारे फॅट यामुळे शरीरात जास्त प्रमाणात कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते.
याशिवाय जास्त प्रोटीन असल्यामुळे अधिक प्रमाणात खाल्यास जुलाब लागू शकतात.

त्याचप्रमाणे किडनीच्या रोग्यांकरिता पनीर खाण्याबाबत डॉक्टर कडे विचारणा करावी. किडनी चा आजार असेल तर अशा लोकांनी पनीर खाणे शक्यतो टाळावे कारण पनीर मध्ये प्रोटीन असते आणि हेच प्रोटीन किडनीरोगी साठी त्रासदायक ठरू शकतं.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *