बातमी

मोबाईल वापरणाऱ्यानो लक्ष द्या, १ सप्टेंबर पासून बदलतील हे नियम

तुम्ही आम्ही सर्वच मोबाईलचा वापर करतोय. पण सध्या सर्वात जास्त लोकं ओटीटी प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत. तुम्हीही त्यातलेच आहात तर तुमच्यासाठी एक दुःखद बातमी आहे. तुम्ही जर डीझणी प्लस हॉटस्टार वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण १ सप्टेंबर पासून रिचार्ज महागणार आहे.

यासोबत अमेझॉन, गुगल, गुगल ड्राईव्ह ही सर्व्हिस वापरणाऱ्या नी लक्षात घेतले पाहिजे की ह्या सर्व्हिस आपल्या नियमात बदल करत आहेत. ह्या बदलावाला १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर पर्यंत पूर्णविराम लागेल. ह्याचा सरळ असा अर्थ होतो की तुमच्या खिशाला कात्री बसणार आहे. वापरणाऱ्या सर्व्हिसना तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. जाणून घेऊया काय बदल होत आहेत.

खोट्या अँपची होणार सुट्टी
१ सप्टेंबर पासून गुगलची नवीन पॉलिसी आमलात येणार आहे. यानुसार चुकीचा आणि खोटा कंटेंट प्रकाशित करणाऱ्या अँपवर बंदी घालण्यात येईल. असे अँप कायमचे गुगल मधून काढून टाकण्यात येतील. गुगल प्ले स्टोअरची पॉलिसी अजून जास्त कडक करण्यात येणार आहे.

OTT ॲप सबस्क्रिप्शन
सध्या Disney Hotstar तुम्ही वापरत आहात तर तुमच्यासाठी ही थोडी दुःखद बातमी असू शकेल.कारण ह्याच्या किमतीत सुद्धा १ सप्टेंबर पासून वाढ होणार आहे. आधी तुम्ही वर्षभरासाठी ३९९ रुपये भरत होते पण आता हीच किँमत १०० रुपयाने वाढली असून आता तुम्हाला ४९९ चा रिचार्ज करावा लागेल. ८९९ च्या रिचार्ज मध्ये तुम्ही दोन स्क्रीनमध्ये हॉटस्टारचा वापर करू शकता. चार स्क्रीनमध्ये तुम्हाला वापर करायचा असल्यास १४९९ चा रिचार्ज तुम्हाला करावा लागेल.

अमेझॉन वरून वस्तू मागवणे होणार महाग
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लॉजिस्टिक कॉस्ट खूप जास्त प्रमाणात वाढली आहे. हे कारण देत अमेझॉनने ऑर्डर केलेल्या वस्तूवर किंमत वाढ करू शकतो. ५०० ग्रॅमच्या पॅकेजवर ५८ रुपये द्यावे लागू शकतात. रिजनल कॉस्ट ३६.५० रुपये असेल.

पर्सनल लोन ॲप
१५ सप्टेंबर पासून नवे नियम लागू होत आहेत. यानुसार जे लोन ॲप लोकांना फसवण्याचे काम करतात आणि लोकांना त्रास देतात अशा ॲपवर बंदी करण्यात येणार आहे. अशाच १०० ॲप ची तक्रार ग्राहकांनी गुगल कडे केली होती. त्यामुळे गुगल ने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या फ्रौड पासून तुम्ही वाचू शकता.

गुगल ड्राईव्ह पूर्णतः बदलणार
गुगल ड्राईव्ह एवढी वर्ष आपण मोफत वापरत आलो आहोत. पण १५ सप्टेंबर पासून ह्यामध्ये सुद्धा बदल होणार आहे. अधिक स्टोरेजसाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील. त्यामुळे आताच तुमचा सेव्ह केलेला डाटा दुसरीकडे ट्रान्स्फर करून घ्या. १३ सप्टेंबर रोजी गुगल ड्राईव्हचा एक अपडेट तुम्हाला मिळेल. यानुसार तुम्हाला याचा वापर अधिक जास्त सुरक्षित होईल.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *