हेल्थ

दूध पिण्याची ही आहे योग्य पद्धत

दूध हे आपण जन्माला आल्यापासून पित आलोय आणि याचे सेवन आपण पुढे कधीही करू शकतो पण ते कसं आणि कधी करावे याची नीट माहिती नसते, त्यामुळे कधी कधी ते पचत नाही. गायीचे दूध हे सर्वात जास्त पौष्टिक आणि पाचक असते याशिवाय कधी कधी जास्त भूक लागली असेल तर ती शांत करण्यासाठी ही दूध हे पूर्णांक घेतले जाते.

सर्वानाच दूध हे गोड चवीचे हवे असते पण गोड होण्यासाठी त्यात साखर घातली जाते. पण हे चुकीचे आहे. साखर घातल्याने ते पचायला जड जाते याशिवाय साखर घातल्याने त्यातील कॅल्शियमही नष्ट होते. साखर घातल्याने ते कफ कारक होते. यासाठी दुधाला गोडी येण्यासाठी त्यात थोड मध घाला किंवा खडीसाखर घाला.

दूध कसे प्यायचे तर ते उत्तमरित्या तापवून प्यायचे आहे. कच्च्या दुधात अनेक प्रकारचे जिवाणू असतात त्यामुळे ते पिने आपल्या शरीरातील घातक असतेच. त्यामुळे दूध चांगले तापवून प्यावे. खर तर दूध पिने हे आपल्या शरीरातील उत्तमच आहे पण त्यासाठी ताजे आणि गाईचे दूध हे उत्तम असते पण जर तुम्ही पॅकेट बंद दूध पित असाल तर ते चांगले नाही.

रात्री सहसा कोणाला भूक लागत नाही किंवा जेवल्यावर असिडिती होते खूप अस्वस्थ वाटते. अशा वेळी थंड दुध प्यावे वीणा साखरेचे त्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. दूध घेतले असल्यास आंबट पदार्थ खाऊ नका, त्यामुळे गॅसचा त्रास होऊ शकतो. याशिवाय खारट आणि नॉन वेज पदार्थ ही खाऊ नका.

याशिवाय रात्रीचे जेवण केल्यानंतर ही तुम्ही दूध पिवू शकता. पण त्याच्यात किमान 2 तासाचे अंतर असायला हवे. शक्य असेल तर नेहमी हळदीचे दूध प्या. त्यातून तुम्हाला शरीरातील वेदना कमी होण्यास मदत होते. याशिवाय ते एक नैसर्गिक पेन किलर आहे हे लक्षात घ्या. शिवाय हळद ही अँटी बॉयोटिकचे काम करते जेव्हा लहान मुलांना खोकला, ताप येतो त्यावेळी गरम दुधात हळद मिक्स करून द्यावी.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *