आता तो जमाना गेला जेव्हा मराठी प्रेक्षक वर्ग हिंदी मालिका पाहून मराठी मलिकेकडे पाठ फिरवत होता. सध्या जिथे मराठी लोक आहेत ते आवडीने मराठी मालिका पाहतात. सध्या आई कुठे काय करते? माझा होशील ना? सुंदरा, माझ्या नवऱ्याची बायको, रंग माझा वेगळा आणि अशा अनेक मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
स्टार प्रवाह या मराठी चॅनलवर सोमवार ते शनिवार या दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता प्रदर्शित होणारी मालिका म्हणजे आई कुठे काय करते ही सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोचली आहे. काही लोक तर साडेसात वाजण्याची आतुरतेने वाट पाहत असतात ते म्हणजे ही मालिका पाहण्याची उत्कंठा त्यांना लागलेली असते. या मालिकेतील प्रत्येक पात्र अत्यंत योग्य रीतीने काम करत आहे आणि प्रेक्षक ही त्यांना भरभरून प्रतिसाद देत आहेत.
या मालिकेत मुख्य भूमिका असणारी अभिनेत्री म्हणजे अरुंधती हिने तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्याचबरोबर घरातील अशी अनेक पात्र आहेत ती सुधा आपले काम अत्यंत चांगल्या रीतीने करत आहेत. अनिरुद्ध , यश, निशा, गौरी, आई, आणि आप्पा यांची कामे ही प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत.

सध्याच्या मालिकेतील कथा ही काही गृहिणींना आपल्या घरातील वाटत आहे म्हणून त्या ही आवर्जून ही मालिका बघत आहेत. अनिरुद्धचा बाहेर ख्याली पणा आपली बायको असताना तब्बल 12 वर्ष त्याच्याच ऑफिस मधल्या कलिग सोबत प्रेम प्रकरण हे आता घरातील सर्वांसमोर उघडकीस आले आहे.
पण तरीही तो आपले कारस्थान लपवून कुठेतरी अरुंधती ला जबाबदार ठरवतो आहे. चला तर बघुया या मालिकेतील पुढील भागात आपल्याला काय काय नवीन पैलू पाहायला मिळणार आहेत. आई सध्या काय करते ही मालिका टीआरपी च्या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहे. पहिले स्थान झी मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या माझा होशील ना ह्या मालिकेने घेतले आहे.
प्रत्येक आठवड्यागनिक हा आकडा बदलत असतो. मागच्या आठवड्यात रंग माझा वेगळा ही मालिका पहिल्या स्थानावर होती. तुम्हाला कोणती मालिका सर्वात जास्त आवडते आणि तुमची आवडती मालिका कोणत्या स्थानावर असली पाहिजे आम्हाला नक्की कळवा.