मनोरंजन

देवमाणूस मालिका आता बंद होणार? त्याच्या जागी येणार ही नवी मालिका

प्रचंड टीआरपी दिलेली मालिका म्हणजे देवमाणूस. लोकांनी ह्या मालिकेला भरपभरून प्रेम दिले. पण सध्या त्यात एक ना अनेक गोष्टी वाढवत नेल्या आहेत. काहीच कारण नसताना त्यामुळे हे लोकांच्या पचनी पडत नाही आहे. काही लोक हे आपला राग सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत तर काहींना ही मालिका अजूनही आवडत आहे.

सध्या या मालिकेत नवीन पात्र म्हणजेच माधुरी पवारची एन्ट्री झालेली आहे. बघुया ते पात्र आपले मनोरंजन करते आहे का? पण आता झी मराठीने याच देवमाणूस च्या जागी म्हणजेच त्याच टायमिंगला एक नवी मालिका सुरू करण्याचा प्रोमो दाखवण्याची सुरुवात केली आहे. ह्या मालिकेचे नाव आहे “ती परत आली आहे” ही नवीन मालिका सुरू होणार आहे.

“ती परत आली आहे” ही मालिका पाहायला गेलात तर हॉरर आहे. असे प्रोमो पाहून तर वाटत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना यात काहीतरी नवीन पाहायला मिळेल असे वाटते. या मालिकेत तुम्हाला विजय कदम हे जेष्ठ अभिनेते पाहायला मिळणार आहेत.

ही मालिका देव माणूस या मालिकेचा वेळेला चालू होणार आहे म्हणजे कदाचित देवमाणूस या मालिकेचा शेवट होईल पण देवमाणूसचे एपिसोड बघता असे वाटत नाही की ही मालिका संपेल कदाचित वेळ बदलतील. “ती परत आली आहे” 16 ऑगस्ट ला ही मालिका चालू होणार आहे.  या मालिकेचे लेखक ही देवमाणूसचे लेखक आहेत यात गूढ असे काहीतरी पाहायला मिळेल त्यामुळे बघुया अजून या मालिकेत नवीन काय पाहायला मिळत आहे. यात दुसरे पात्र ही असतील पण त्यांची माहिती मिळाली नाही आहे.

देवमाणूस वगळता इतर झी मराठीवरील मालिका टीआरपी च्या बाबतीत खूप मागे आहेत. त्यामुळे झी मराठी देवमाणूस मालिका बंद करेल ह्याबाबत थोडी शंका आहे. तरी बघुया पुढे काय होणार, वेळेनुसार सर्व गोष्टी आपल्या समोर येतीलच.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *